संगीत शाकुंतल मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक आहे. या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अजरामर संगीत नाटकांच्या परंपरेची सुरवात झाली. कालिदासाच्या 'अभिज्ञानशाकुंतलम' या संस्कृत नाटकाचे हे मराठी रूपांतर आहे.
संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर, इ.स. १८८२ या दिवशी पुण्याच्या पूर्णानंद थिएटरात झाला. ’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.