बन्याबापू ऊर्फ नरहरी गणेश कमतनूरकर हे एक मराठी नाटककार होते. ते प्रसिद्ध लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी होते. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकर्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत.
संगीत श्री
’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक नरहर गणेश कमतनूकरांनी इ.स. १९२२ साली लिहिले. घोड्यांच्या रेसच्या नादावा दुष्परिणाम हा नाटकाचा विषय होता. ’ललित कलादर्श’ या नाट्यसंस्थेने हे नाटक १९२४ साली रंगभूमीवर आणले.