“भाकर देता येत असली, स्वावलंबनाने, स्वाभिमानाने भाकर देता येत असली तरी ती न देऊन, उपवास करावयाला लावून का तो असंतोष निर्माण करावयाचा आहे? खेड्यातील अन्नहीन लोकांस थोडे अन्न मिळू लागल्याने त्यांची स्वातंत्र्याची तहान का दूर होईल? तुम्ही दोनदा, चारदा देवून तुमची जर स्वातंत्र्याची तहान मरत नाही, तर त्यांची का बरे मरेल? आणि खादीच्या किंवा ग्रामोद्योगाच्याद्वारा जाणारा घास हा साधा घास नाही. त्याच्याबरोबर राष्ट्रप्रेम जाईल. त्या घासाबरोबर नवविचार, निर्भयता, स्वातंत्र्य यांची जीवनतत्तवे गेल्याशिवाय राहाणार नाहीत,” स्वामी म्हणाले.
“पण खादीच्या वगैरे अटी पाळण्यांत एक प्रकारची बुवाशाही आहे. हा संप्रदाय कशाला? गोविंदाने विचारले.
“प्रत्येकाच्या तत्तवाबरोबर काही चिन्हेहि येतात. त्यांना म्हटले तर महत्त्व नाही, म्हटले तर आहे. इटलीतील फॅसिस्ट लोक काळे सदरे वापरतात. मुक्तिफौजेचे लोक भगवे कपडे वापरतात. कॉन्ग्रेस खादी वापरते. यांत गुलामगिरी कसली? ते ऐक्याचे चिन्ह आहे. सरकारलासुद्धा खादीतील तेज कळते. काही ठिकाणी त्यांनी चरखे जाळले, गांधीटोपी घालणारांत शिक्षा केल्या; माहीत आहे का? खादीच्या पाठीमागे त्याग आहे, तपश्चर्या आहे. खादी पवित्र वस्तु झाली आहे. तुरुंगात टकळी कातावयास मिळावी म्हणून उपोषणेहि करण्यांत आली. खादी म्हटली म्हणजे हे सारे आठवले पाहिजे. वंदेमातरम् गीत ज्याप्रमाणे त्यागाने, कष्टाने, मरणाने पवित्र झाले आहे, त्याप्रमाणे खादीही झाली आहे. अशी खादी राष्ट्राचे प्रतिक झाले तर काय बिघडते? खादी त्यागाचे, ऐक्याचे, श्रमजीवनाचे व यशाचे चिन्ह आहे,” स्वामी म्हणाले.
“खादी वापरली की, गांधीचे सारे तत्त्वज्ञान आमच्या बोडक्यावर बसवितात. खादी वापरता नी चिरूट ओढता, खादी वापरता नी विडा खाता, खादी वापरता नी समाजसत्तावाद बोलता, खादी वापरता नी हिंसेची चर्चा करता—अशा प्रकारे लोक आम्हांस छळतात,” गोविंदा म्हणाला.
“ती गांधाळांची चूक आहे. खादीकडे केवळ आर्थिक दृष्टीने पाहा. ज्या खेड्यातील उपाशी बंधुभगिनींसाठी आजच्या परिस्थितीत मी काही करू शकत नाही, त्यांना जर या खादीने घास मिळत असेल, तर घेऊ दे. मला खादी—याच एका विचाराने खादी वापरा असे महात्माजी म्हणतात. आपद्धमं म्हणून तरी आज ती सर्वांनी वापरायला हवी. तिच्या पाठीमागे तत्तवज्ञान काय आहे ते ज्याचा तो जाणे. आपण ते आपल्या बोडक्यावर कोणी लादले तर लादून घेऊ नये. त्या भीतीने खादी न वापरणे म्हणजे भीरुता आहे,” स्वामी म्हणाले.
“पुष्कळ वेळ झाला. तुम्हाला त्रास झाला,” नारायण म्हणाला.
भाकर देता येत असली, स्वावलंबनाने, स्वाभिमानाने भाकर देता येत असली तरी ती न देऊन, उपवास करावयाला लावून का तो असंतोष निर्माण करावयाचा आहे? खेड्यातील अन्नहीन लोकांस थोडे अन्न मिळू लागल्याने त्यांची स्वातंत्र्याची तहान का दूर होईल? तुम्ही दोनदा, चारदा देवून तुमची जर स्वातंत्र्याची तहान मरत नाही, तर त्यांची का बरे मरेल? आणि खादीच्या किंवा ग्रामोद्योगाच्याद्वारा जाणारा घास हा साधा घास नाही. त्याच्याबरोबर राष्ट्रप्रेम जाईल. त्या घासाबरोबर नवविचार, निर्भयता, स्वातंत्र्य यांची जीवनतत्तवे गेल्याशिवाय राहाणार नाहीत,” स्वामी म्हणाले.