मम्मी पप्पानी पिंटू ला आज्या च्या घरी सकाळी सकाळी सोडले. दोघानांही कुठे जायचे असले म्हणजे खूप प्रश्न विचारणारा पिंटू म्हणजे एम्ब्रॅसमेंट होती. आजा सकाळी  टीव्ही वर बादशाचे कुठले तरी भिकार संगीत ऐकत बसला होता.

"आज्ज्या" पिंटूने हाक मारली.

"तुम्ही बाहेर जाणार नाही काय ? " पिंटूने विचारले.

"का रे ? आज काय आहे विशेष बाहेर ? " आज्ज्याने विचारले.

"तुम्ही सगळ्या देशप्रेमी घटनात भाग घेतला होता ना ? गांधीजींच्या बरोबर तुम्ही मिठाच्या सत्याग्रहांत वगैरे भाग घेतला होता ना ? " पिंटूने सरळ सरळ उत्तर देण्याचे टाळले पण आज्ज्याला तो नक्की कुठे जात आहे हे समजले.

"काय ? ब्रिटिश परत आलेत काय ? कि पुंन्हा मिठावर आणखीन टॅक्स वाढवला ? " आज्ज्याने खोचक पणे विचारले.

"आज्ज्या काय बोलतोय ? देशांत नवीन बदल आलाय म्हणे. माओ प्रमाणे मोदींनी "ग्रेट लीप फॉरवर्ड" घेतलीय, "कल्चरल रेव्होल्यूशन" आलेय असे त्यांच्या मंत्र्यांनीच म्हटलेय. देशप्रेमाच्या सगळ्या घटनात आपण होता ना ? मिठाच्या सत्याग्रहांत तुम्ही गांधीजींच्या बाजूने चालला होता, भगत सिंघाला फाशी देताना तुम्ही तिथे होता, आझादांच्या अटकेच्या वेळी तुम्ही त्याला कव्हर फायर दिले होते, सुभाष चंद्राच्या आजाद हिंद सेनेत तुम्ही कर्नल होता, नेहरूंना गोवा मुक्त करण्याचा सल्ला तुम्ही दिला होता असे तुम्हीच सांगताय ना ? मग ह्या वेळी तुम्ही भाग नाही घेणार काय ? " पिंटूने विचारले.

आजीनी अर्थपूर्ण दृष्टीने "मी नव्हते सांगत तुम्हाला असे बोलू नका म्हणून ?" असे सांगणारा कटाक्ष टाकला. आज्ज्याने स्वतः भाला मोठा आवंढा गिळून टीव्ही बंद केला नाही तरी त्यावर चालणारे नृत्य पिंटूने पाहण्या सारखे नव्हते.

"शिवाजी महाराजांचा इतिहास ठाऊक आहे ना तुला ?" सोफ्यावर पाय वर घेऊन बसलेल्या पिंटूला आज्ज्याने विचारले. "होय ना" पिंटूने आत्मविश्वासाने म्हटले.

"मला एक सांग शिवाजी महाराज १००% बरोबर होते असे वाटते का तुला ?"

"हो ना त्यात काय शंका?" पिंटूने भाबडे पणाने सांगितले.

"मग मला एक सांग त्यावेळच्या सर्व हिंदू राजांनी शिवाजी महाराजांना का साथ नाही दिली ? मुघलांच्या सेवेतील सर्व हिंदू सैनीक सरदारनी शिवाजी महाराजांना का नाही साथ दिली ? " आज्ज्या ने आणखीन एक गुगली टाकली.

पिंटू थोड्या विचारांत पडला. "एक तर ते सर्व लोक मूर्ख असतील." पिंटूने आपले निष्कर्ष सांगितला. "एवढी भली मोठी सत्ता मूर्ख लोकांना घेऊन मुघल चालवीत होते काय ?" आज्ज्या प्रतिपश्न केला.

"हे सर्व लोक देशद्रोही होते. धर्मावर आणि देशावर त्यांना प्रेम नव्हते. म्हणून त्यांनी महाराजांना साथ नाही दिली " पिंटूने सांगितले.
आजीने आणून ठेवलेला शेव कवळी सांभाळत आज्ज्याने तोंडात कोंबला आणि थोड्याश्या निराशेनेच डोके हलवले. पिंटूने प्लेट मधील दोन बेसन लाडू उचलले.

"टिळक ह्यांच्या बद्दल काय ठाऊक आहे तुला ? " आज्ज्याने शेव खात विचारले.

"स्वराज्य ... हा माझा ..." असे डायलॉग पिंटूने सोफ्यावर उडया मारीत तर स्वरांत किंचाळले.

"ठीक आहे ठीक आहे" आज्ज्या ने त्याला ओढून खाली बसवले. मला सांग त्याकाळी टिळकाना अटक करणारे पोलीस आपलेच हिंदू/भारतीय लोक होते ना ? टिळक एव्हडे चांगले होते आणि बरोबर होते तर मग ह्या भारतीयांनी बंद पुकारून इंग्रजांना का नाही हाकलून लावले ? सावरकरांच्या कैदेवर पहारा देणारे लोक, गांधीजींच्या सत्याग्रहावर लाठी हल्ला करणे पोलीस, भगात सिंघाला फाशी देणारा मांगइत्यादी सर्व लोक तुझ्या माझ्यासारखेच भारतीय होते. टिळक सावरकर इत्यादी मंडळी रास्त होती तर ह्या लोकांनी त्यांची बाजू का नाही उचलून धरली ?

पिंटू गोंधळाला. एक बेसन लाडू त्याने तोंडांत कोंबला होता. दुसरा तो कोंबण्याच्या तयारीत होता. त्याचा मेंदू कदाचित फ्यूस झाला असावा. पण तो शेवटी बोललाच. "ह्या सर्व पोलिसांना सरकार पगार देत होते. टिळकांची किंवा सावरकरांची बाजू घेणे म्हणजे नोकरी सोडायला लागली असती. ह्या सर्व लोकांनी आपल्या पगाराला जास्त महत्व दिले."

"हा ! अगदी बरोबर " आज्ज्या ने अतिशय आनंदून पिंटूला दाद दिली. हा नातू आपलाच आहे ह्याची खात्री त्याला पटली.

"पण फक्त पगारच नाही पिंटू, कुठल्याही मोठ्या स्थापित झालेल्या संस्थेत लोकांची अनेक प्रकारची गुंतवणूक असते. सरकारी कंत्राटावर जगणारे लोक असतात, राजकारण्यांच्या कृपेवर फायदा करून घेणारे लोक असतात, सरकारी शाळेंत सरकारी प्रोपागंडा चालतो. त्यातून सरकारात एक भावनिक गुंतवणूक सुद्धा होते. हि सुद्धा महत्वाची असते. आमच्या लहान पणी शाळेंत "भो पंचम जॉर्ज" म्हणून इंग्लंड च्या राजाची स्तुती गायली जायची. रॅम मनोहर रॉय इत्यादी मंडळींनी "ब्रिटिश म्हणजे दैवी वरदान" इत्यादी कसे सिद्ध केले आहे ह्यावर आम्ही निबंध लिहायचो. राजाच्या वाढदिवसाला आम्हाला विदेशी चॉकलेट मिळायचे. ब्रिटनच्या धुरंधरांनी कुठे कुठे कसा विजय मिळवला, ब्रिटनच्या राज्यात सूर्य कसा मावळत नाही वगैरे गोष्टी ऐकून आमचा उर भरून यायचा. आमच्या सारख्या नालायक आणि अशिष्ट भारतीय लोकांना गोरे इंग्रज इंग्रजी वगैरे शिकवून कसे माणसांत आणत आहेत ह्याची चर्चा वर्तमान पत्रांतून व्हायची. इंग्लंडची राजमाता वृद्ध झाली तिला व्हीलचेर मधून फिरवतानाचे काळे फोटो वर्तमान पत्रात आलेले पाहून आमचा कंठ दाटून यायचा. इंग्लंडची सध्याच्या राणीने दुसऱ्या महायुद्धांत जीप मेकॅनिक चे काम केले होते. हे पाहून आम्हा सामान्य लोकांना सुद्धा राणी आपल्याच सारखी आहे असे वाटले होते. "

"आज्ज्या तू भरकटत आहेत. हे सगळे हजार द ऐकलेय मी " पिंटूने आज्ज्याला स्वप्नातून बाहेर आणले.

"तर सांगायचा मुद्दा हा पिंटू कि सावरकर असो व टिळक किंवा शिवाजी किंवा तुकाराम असो वा ज्ञानेश्वर किंवा फुले. हे त्याकाळचे सेलेब्रिटी नव्हते. उलट बंडखोर होते. त्यांनी मांडलेले बहुतेक विचार लोकांना मान्य नव्हते. सामान्य जनता प्रोपागंडा आणि स्वार्थ ह्याने प्रेरित होती. सत्य पाहण्याची दृष्टी ह्या महान विभूतींना होतीच पण स्वतःला अतिशय त्रास भोगून ते सत्य लोका पुढे मांडण्याची हिम्मत होती."

"तुला ती नागड्या राजाची कथा ठाऊक आहे ना ? " आज्ज्याच्या तोंडून नागडा शब्द ऐकून पिंटू खो खो हसला.

"तर ह्या राजाला कुणी तरी बिलंदर माणूस दैवी कपडे म्हणून अदृश्य कपडे देतो. राजा हे नसलेलं कपडे घालून दरबारांत सुद्धा येतो. कुणालाही सत्य सांगण्याची हिम्मत नसल्याने सर्वच लोक कपड्याची स्तुती करतात. राजा सुद्धा ह्या सर्व लोकांना दिसत असेल तर कदाचित असतीलच कपडे म्हणून आणखीन शेखी मिरवतो. शेवटी एक लहानगा मुलगा ज्याला राजाचे महत्व ठाऊक नसते तो `राजाने कपडे का नाही घातलेत ?` असा प्रश्न करतो आणि राजाच्या अदृश्य कपड्यांचे अजाणते पानाने भांडे फोड करतो. "

"टिळकांच्या काळांत "भो पंचम ... " म्हणजे म्हणजे राष्ट्रप्रेम होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध बोलणे म्हणजे देशद्रोह होता. आज आम्ही त्यांना देशप्रेमी समजतो पण त्याकाळी ते एक देशद्रोही अँटी-नॅशनल होते."

पिंटूने डोके खाजवले. "नक्की काय म्हणायचे तुला आज्ज्या?"

"तू सांग बरे ?" आज्ज्या ने पुन्हा टीव्ही चालू केला. दाती महाराजांच्या भविष्य कथनाचा वेळ होता.

"म्हणजे जेंव्हा लोक "देशप्रेम"-"देशप्रेम" म्हणून ओरडतात तेंव्हा कदाचित खरा देशप्रेमी जे बोलतोय त्याला लोक देशद्रोही म्हणतात ? " पिंटूने विचारले.

"अगदी बरोबर. नेहमीच असे असेल असे नाही. पण बहुतेक वेळा "चांगला आवाज" देशप्रेमाच्या घोषणात विरून जातो." - आज्ज्या

"तर आता पंतप्रधानाच्या ह्या नवीन चळवळीला लोकांनी देशप्रेमाने साथ द्यावी कि ना द्यावी ? " पिंटू आणखीन गोंधळाला.

"पिंटू, स्वतंत्र देशांत लोक आपल्या स्वप्ना साठी जगतात राजकारण्यांच्या स्वप्ना साठी नाही. इतरांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी गुलाम लोक धडपडतात स्वतंत्र लोक नाही. सध्या मोदी भक्तीच्या अंधारात घोषणा देणारे देशभक्त आणि "भो पंचम ... " म्हणून ब्रिटनच्या राजाला प्रार्थना म्हणून देशप्रेमाने भरून जाणारे लोक ह्यांत काहीही फरक नाही आहे. ब्रिटनचा उद्धेश भारतीय लोकांच्या कष्टातून निर्माण झालेला पैसा सरकारी खजिन्यात कर रूपाने जमा करणे हा होता. ह्या उद्देशाला विरोध करणार्यांना देशद्रोही म्हटले जायचे, कायदा तोडतोय म्हणून गुन्हेगार म्हटले जायचे."

"मिठावरील कराच्या विरोधांत गांधीजीनी चळवळ उभारली. अमेरिकेत कराच्या विरोधांत गोऱ्या लोकांनीच गोऱ्या ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करून त्यांना हाकलून लावले. पण आज मिठाच्या दरावर लक्ष ठेवण्यासाठी "मीठ कमिश्नर" नावाचे भले मोठे सरकारी कार्यालय आहे. ह्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात आणि मिठावर कर लावून तो खर्च वसूल केला जातो. थोडक्यांत काय तर ब्रिटिशांच्या मिठावरील कराल विरोध केला म्हणून गांधीजींना देशप्रेमी पण त्याच प्रकारचे हजारो कर लावून आपली तिजोरी भरणाऱ्या भारत सरकारच्या कराला विरोध करणारे मात्र देशद्रोही ठरत आहेत. केशलेस म्हणजे काय तर आम्ही २% जास्त पैसे भरून सरकारी हाफीसांत आमच्या पैश्यावर जगणार्या हाफिसार लोकांना आमच्यावरच कडक नजर ठेवण्याचे काम आंम्हीच सोपे करावे."

पिंटू एव्हाना आज्ज्याचे बोलणे अतिशय विचारपूर्वक ऐकत होता.

"म्हणजे केशलेस झाले तर आम्हाला जास्त पैसे मोजून सरकारी तिजोरी भरावी लागणार? " पिंटूला आज्ज्याचे म्हणजे पटले.

"अरे हो. सगळे कर सरकारी तिजोरी भारण्यासाठीच असतात."

"पण मोदीजी सांगत होते कि भ्रष्टाचारी लोक कर भारत नाहीत आणि हे सगळे त्यांना पकडण्यासाठी आहे ? आणि अतिरेकी , पाकिस्तान इत्यादी लोकांसाठी आहे. ह्यांना विरोध करणे आमचे कर्तव्य नाही काय ? "

आज्ज्या खो खो हसला. पण कवळी बाहेर पडेल म्हणून त्याने ती सांभाळली.

"इंदिरा गांधींनी असल्याचं प्रकारची कारणे देऊन आणीबाणी लावली होती. सरकारला विरोध करणार्यांना CIA, KGB एजन्ट म्हटले जायचे. भारत विरोधी शक्तींना विरोध करणे, राष्ट्रांमध्ये शिस्त आणणे ह्या नावाखाली इंदिरा गांधींनी देशांत आणि बाणी लावली होती. पण मूळ उद्धेश स्वतःला शिक्षेपासून वाचवणे हा होता. त्याकाळी देशविरोधी म्हणून जेल मध्ये गेलेल्या लोकांना आज आम्ही देशप्रेमी म्हणतो. "

"अरे राजकारण्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यांना हवा असतो जनतेचा पैसा आणि स्वतःची खुर्ची. पाकिस्तान, अतिरेकी असली करणे दिली कि सरकार्लच्या विरोधांत बोलणे म्हणजे अतिरेकींच्या समर्थानात बोलणे असे वाटते त्यामुळे अनेक लोक आपले तोंड बंद ठेवतात."

पिंटूला म्हणजे पटले. "पण मग आज्ज्या, सरकार आमच्या कडून जास्त पैसा उकळण्यासाठी हे सगळे करत असेल तर आम्ही खऱ्या देशप्रेमींनी त्याच्या विरोधांत आवाज उठवायला नको का ? तुम्ही ह्याच्या विरोधांत बोलणार नाहीत का ? "

"हे बघ मी चिक्कार पैसा केलाय. काही वर्षांत मी देवाघरी जाणार. ज्या काळी तोंडांत दांत आणि बाहूंवर मसल होते त्याकाळी मी चिक्कार फाईट मारल्यात. आता हा केबल TV पाहत मी दिवस घालवेन. मला बाहेर जाऊन गोंधळ घायला काहीही गरज नाही. ती जबाबदारी खरेतर तुझ्या बापाची आहे. पण तो आधीपासून आहे सरकारी नोकर. चाबुकाच्या दुसऱ्या तोखला असण्यापेक्षा तो चाबूक हातांत असलेला बरा अशी त्याची विचारसरणी आहे."

"मग मी काय करावे?" पिंटूने प्रश्न केला.

"अरे तुला अक्कल आहे, हुशारी आहे. तू IAS हो. हा सगळा कर रूप पैसा मग सरळ तुझ्या हातांत जाईल. विदेशांत फिरून ये. लाल बत्तीची गाडी असली कि सामान्य घाणेरडे लोक बाजूला होऊन तुला वाट देतील. तुला ह्या गर्दीच्या मुंबईत भाला मोठा बंगला मिळेल, दहा नोकर चाकर असतील, विमानात बसायला तुला लाईनीत उभे राहावे लागणार नाही. कुठलेही बिल स्वतःच्या खर्चाने भरावे लागणार नाही."

"अरे ब्रिटिश सोडून गेले, पण ती सिस्टीम मागे सोडून गेलेय. आता त्यांच्या देशांत सुद्धा त्यांना विशेष काही ट्रीटमेंट मिळत नाही पण भारतातील राजकारणी आणि बाबू लोकांना मात्र तीच जुनी राज सिस्टम वापरायला मिळते. अंगी चतुराई असेल तरी तिथे प्रवेश केला कि आयुष्य सुकर होऊन जाते."

"आज्ज्या, म्हणजे नेहरू नी जे केले तेच मी करावे असे म्हणायचे आहे काय ? " पिंटूने विचाले

"अरे हो शाळेत नाही का शिकवत नेहरू वगैरे आपले आदर्श असावेत म्हणून ?" दाती महाराजांचे भविष्य सांगून संपले होते. आज्ज्याने पोगो वर डोरेमॉन लावून नातवाला दिला त्यांत तो गुंग झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel