१८६४
"तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये
व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले."
श्री काशीच्या वास्तव्यास असताना एका कोटयधीश पुण्यावान व्यापार्‍याची ख्याती होती. पत्रास कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जिवावर चालत असे. नवज्वराने त्या व्यापार्‍याला अकाली मरण आले, पत्नी सती जाण्यास निघाली. तेवढयात अयोध्येत भेटलेले रामशास्त्री
( सध्या काशीस वास्तव्यास राहिलेले ) गर्दीतून पुढे आले व त्यांनी त्या पत्नीस श्रींच्या दर्शनास आणले. श्रीं "या पुण्यबान आत्म्यास बघू या " म्हणून मणिकर्णिका घाटावर शास्त्रीबुवांबरोबर आले. तेथे प्रेतास पाहिल्याबरोबर श्री म्हणाले, "हा तर जिवंत आहे, माय तुमचा पति जिवंत असताना तुम्ही सती कशा जाता ? असे म्हणून गंगाजल मागबून तीन वेळा ’श्रीराम ’ म्हणून प्रेताच्या तोंडात घातले. दोन-तीन मिनिटांतच डोळे उघडून तो व्यापारी उठून बसला. जो तो श्रींच्या पाया पडण्यास धडपडू लागला. तेवढयात श्रींनी गंगेत उडी मारली. ( श्रीब्रह्यानंदांनी आरतीमध्ये म्हटलेच आहे, "वाराणसी क्षेत्रादि प्रेतव पदकिसिदावने " ) व तात्काळ नाहिसे झाले. तो व्यापारी मोठया आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला. नंतर त्याने पुष्कळ दानधर्म, अत्रदान केले; पण ज्या महापुरुषाने आपले प्राण वाचवले त्याचे दर्शन पुन्हा व्हावे ही तळमळ राहिली. श्री काशीहून निघाले, ते कुठेही न थांबता प्रयागला आले. तेथील काही बैरागी लोक महंताच्या शोधात फिरत होते. श्रींचे वय वीसच्या आसपास, दाढी व जटा वाढलेल्या अंगावर ब्रह्यचर्याचे आणि अध्यात्माचे तेजअशी श्रींची मूर्ती पाहिल्यावर त्या बैरागी लोकांनी त्यांनाच महंत करून टाकले. पुढे ही सर्व मंडळी मथुरा, वृंदावनाकडे गेली. तेथे ज्या बंगाली जमीनदार कुटुंबाला श्रींच्या आशीर्वादाने मुलगा झाला होता, त्या परिवाराच्या संबंधित माणसाची श्रींशी गाठ पडली. त्याने श्रींना सर्व परिवारासह कलकत्त्यास नेले. तेथे जमीनदाराव्या सर्व कुटुंबातील मंडळींनी छोटया मुलाला श्रींच्या पायावर घातले व त्यांचा आशीर्वाद घेतला. "आपली काहीतरी सेवा करावी अशी इच्छा आहे, तर आम्ही काय करू ते सांगा ?" अशी विनंती केली. त्यावर श्री म्हणाले, "आम्ही बैरागी लोक, आम्हाला कशाचीही जरूरी नाही. तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे, म्हणजे मला सर्व पोचले." पण ती मंडळी ऐकेनात तेव्हा श्रींनी त्यांना ’  
’हरिहाट ’ करायला सांगितले.  हरिहाट म्हणजे भगवंताच्या प्राप्तीची जी जी साधने आहेत, ती सर्व एकदम सुरू करून सात दिवस अखंड चालवायची. एक अत्रछत्र सुरू करून सात दिवस मुक्तद्वार ठेवायचे. त्या मंडळींनी एकदम हरिहाटाची तयारी सुरू केली. कलकत्त्यापासून दोन मैलांवर एक मोठा मांडव उभारला. देशातल्या सर्व शास्त्रीपंडितांना, कलावंतांना, विद्वानांना निमंत्रणे पाठविली. धान्य, कपडा, चांदीची भांडी खरेदी केली. तयारीला १५ दिवस लागले. एका सुमुहूर्तावर यजमानाने श्रींची हत्तीवरून मिरवणूक काढली, श्रींना उच्चासनावर बसवले व वेदमंत्रांनी समारंभास सुरुवात झाली. वेदपारायण, यज्ञ, जप, भजन, कीर्तन, पुराणवाचन, योगासने, पंचाग्निसाधन, नामस्मरण, ब्रह्यकर्म, देवतार्जन, वाममार्ग, तंत्रक्रिया इत्यादि साधने सुरू झाली. अन्नछत्र चालू झाले. रोज नवीन पक्वान्न होई, सर्वांना पोटभर मिळे. सात दिवसांत अक्षरशः हजारो बैरागी, आंधळे, पांगळे, भिकारी, श्रीमंत, गरीब पुरुष, स्त्रिया, मुले तेथून जेवून गेले. बहुतेक सर्व कलकत्त्यातील लोक समारंभ पाहून गेले. श्री स्वतः सकाळ-संध्याकाळ मंडपात येऊन सर्वांची चौकशी करीत. आठव्या दिवशी यजमानाने श्रींची महापूजा केली व महावस्त्र अर्पण करून एक हजार रुपयांचे भरलेले ताट दक्षिणा म्हणून पुढे ठेवले. श्रींनी ते वस्त्र यजमानीण बाईंना प्रसाद म्हणून दिले व दक्षिणा काशीच्या विद्वान पंडितांना वाटून टाकली. हरिहाट संपल्यावर श्रींनी बरोबरच्या लोकांना अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिले व जमीनदार परिवाराचा निरोप घेऊन एका रात्री कुणाला न कळवता तेथून चालते झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel