नामजपाचे सतत स्मरण व्हावे यासाठी आपल्या नजरेसमोर देवतेच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे उपयुक्‍त ठरते. सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्यांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात. बर्‍याचदा वास्तूचे किंवा वास्तूतील खोलीचे छत हे उतरते असते, म्हणजेच जमिनीच्या पातळीशी समांतर नसते. इमारतींमधील खोल्यांच्या तुलनेत कौलारू घरांच्या बाबतीत ही शक्यता अधिक असते. यामुळे वास्तूत अयोग्य स्पंदने तयार होतात. यावर उपाय म्हणून देवतांच्या नामपट्ट्या खोलीतील बाजूच्या भिंतींवर अशा प्रकारे एका रेषेत लावाव्यात की, त्या नामपट्ट्यांमुळे जमिनीच्या पातळीशी समांतर असे सूक्ष्मातील छत निर्माण होईल. नामपट्ट्यांतून निघणार्‍या चैतन्यलहरी जास्त प्रमाणात जमिनीला समांतर आणि समोर जात असल्यामुळे हे सूक्ष्म-छत तयार होते. यामुळे वास्तूत चांगली स्पंदने निर्माण होतात आणि वास्तूचे रक्षण होते. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel