दिनांक- 27/02/2050
वार- रविवार!
वेळ- सकाळी चार!
मुंबईत अंधेरी येथे "के. के." हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता. वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता!
"सी.एम. डब्ल्यू" कार ताशी 80 च्या वेगाने भन्नाट धावत होती. त्यात एकच व्यक्ती बसलेली होती. ड्रायव्हर सीटवर. गाडी चालवत! सृष्टीचे चक्र बिघडल्याने आता सरासरी रोज पाऊस पडायचाच!!
त्या व्यक्तीचा मोबाईल हॅण्डसेट एका केबलद्वारे त्या कारमधल्या एका फ्रंट डिस्प्ले पॅनेल ला जोडलेला होता. त्यातून डॅनियल नावचा व्यक्ती त्या कारमधल्या व्यक्तीशी इंग्लीशमधून बोलत होता, "विक्रम, कुठे आहेस? पोहोचला नाहीस का अजून?"
विक्रम म्हणाला, "मला नेमकी माहिती मिळायला मेहेनत करावी लागली रे. पण शेवटी मिळाली. एवढ्या मोठ्या शहरात नेमकी डीलीव्हरीची शक्यतो पहिली केस कोणती ही माहिती मिळवणे सोपे काम नव्हते!"
डॅनियलः "मित्रा, मला उत्सुकता लागून राहीली आहे. कसा असेल तो जीव? आतापर्यंत सगळं जग शांत झोपलंय. ते अनभिज्ञ आहे की आज मध्यरात्री बारा वाजेनंतर जन्मलेल्या अनेक जीवांपैकी हा एका जीव एका अभूतपूर्व बदलाची सुरुवात असेल"
विक्रम: "डॅन, अजुन ते निश्चित नाही. म्हणूनच तर आपण बघायला जाण्याचा एवढा आटापीटा करतोय. बघितल्यावर खरे काय ते कळेल. कदाचीत ते गुणधर्म नंतर जाणवायला लागतील आपण अजून बरेच जीव बघून त्यांची नोंद ठेऊ. त्यांचा पुढे फॉलो अप करु"
डॅनियलः "ओके विक्राल.. पण आपला अंदाज खरा ठरेल बघ."
विक्रम: "डॅन, डोन्ट कॉल मी विक्राल... इट मेक्स मी फिल डीमन लाईक"
त्यांचा तो संवाद सुरू होता. गाडी वेगाने धावतांना दिसत होती. वरुन बरसणार्या पावसाच्या धारांना झेलत.
अजून बरेच अंतर पार करायचे होते.
एक मोठा पूल पार केल्यावर "ट्रेड सेंटर" आणि मग ते भलेमोठे हॉस्पीटल. "के. के." हॉस्पिटल.
त्या हॉस्पिटल मधील बारा वाजेनंतरची ही पहिली डीलीव्हरी. आईसोबतचे नातेवाईक. आईची आर्त कींकाळी. मग बाळाचा रडण्याचा आवाज.....अन बाळ बघून डॉक्टरच्या डोळ्यात एक अभूतपूर्व भीतीयुक्त चमक....!!
मध्ये शिरतांना विक्रमला सुरक्षारक्षकाने आणि इतर अनेकांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता.
पण त्याने सगळ्यांच्या डोळ्यात एका उपकरणाद्वारे काही मिनिटे प्रभाव असलेली एक इमेज प्रोजेक्ट केली ज्यामुळे तितकी मिनिटे त्या सगळ्यांना एक ठरावीक चित्र डॉळ्यासमोर दिसले. विक्रम दिसला नाही. तो आत शिरेपर्यंत!
डॉक्टरच्या डोळ्यातली ती अभूतपूर्व भीतीयुक्त चमक विक्रमच्या डोळ्यातही दिसली. म्हणजे आता सगळ्यांना कळणार. काहिही लपून राहाणार नाही? कसे सांगणार जगाला समजावून? ही बातमी टी.व्ही वर यायला सुरुवात झाली.
***
त्याच सकाळी सहा वाजतांनाची गोष्ट.शहरात एके टीकाणी पावसामुळे ट्रॅफिक जाम होता. एका पिवळ्या कारचालकाचा दुसर्या लाल कारला अगदी थोडा धक्का लागला होता.पण लाल कारचा मालक सरळ गाडीखाली उतरून पिवळ्या कारच्या मालकाला चाकूने भोसकू लागला. जवळ जवळ जिवानिशी मारणार होता तो! ही बातमी टि.व्ही. वर आली..
एवढ्याशा घटनेमुळे कुणी इतके हिंसक कसे होवू शकते बरे?
प्रसिद्ध चित्रकार सुरेश संत हे चित्र काढता काढता अचानक थांबले. त्यांना आज सकाळपासून उत्स्फुर्तपणे काही सुचतच नव्हते. असे पहिल्यांदाच होत होते. उभ्या आयुष्यात. ते चित्र काढूच शकत नव्हते. काढता काढता मध्येच त्यांनी अपूर्ण राहीलेल्या चित्रावर काट मारली. आतापर्यंतची मेहेनत वाया गेली. त्यांनी स्वतःच ती वाया घालवली. ही बातमी टी. व्ही वर ठळकपणे येत होती.
त्यांनी चित्र काढायचे कायमचे थांबवले. कारण चित्र म्हणजे काय हे जवळपास त्यांना कळेनासे झाले होते.
हा स्मॄतीभ्रंशाचा प्रकार होता का? नाही! इतर सगळे त्यांना आठवत होते, फक्त चित्र कसे काढायचे ते सोडून...!!
***
अंधेरीच्या एका फ्लॅट मध्ये डॅनियल शी बोलताना विक्रम या सगळ्या बातम्यांची सांगड घालत होता. त्या दोघांव्यतिरिक्त इतर अनेकांना या घटनांची सांगड घालता येत नव्हती. शक्यच नव्हते ते. डॅनियल शी बोलून झाल्यावर विक्रमला तो दिवस आठवला...
एके ठीकाणी उत्खननात भिंतीवर लिहिलेला तो विचित्र संदेश आणि त्याखाली असलेले दोन घड्याळांचे चित्र. प्रत्येक आकड्याच्या ठीकाणी एकेक ग्रह आणि बाजूला त्याच घड्याळाची उलट आरशातली प्रतिमा. अन त्यानंतरच्या आणि आधीच्या काही घटना..आणि आजचे ते बाळ!
टि.व्ही. वर आता अनेक विचित्र अविश्वसनिय बातम्या येवू लागल्या. आज असे काय घडले?
****
त्याच दिवशी मरिन ड्राईव्ह वर एक जोडपे बसलेले होते. त्यातल्या पुरुषाला त्या स्त्रीबद्दल कोणतेच आकर्षण अचानकच वाटेनासे झाले. स्त्रीलाही तसाच अनुभव येवू लागला. एकमेकांबद्दल त्यांना उलट एक प्रकारची घृणा वाटायला लागली. ही मनातली भावना नवीनच होती. त्या दिवशी लग्न झालेले एक जोडपे. त्यांना सुद्धा असाच अनुभव आला. त्यांच्या लग्नात हातावर मेंदी काढण्यासाठी लाख प्रयत्न करूनही कुणालाच मेंदी काढता येणे शक्य झाले नाही. नव वधूला साज शृंगाराचा कधी नव्हे एवढा तिटकारा वाटायला लागला.
त्या दिवशी भराभर अॅक्सिडेंट होवू लागले. जणू काही माणसांमधली सहनशक्ती संपली होती. रांगेत उभे राहाण्यास लोक नकार देवू लागले. रांगेतल्याच एकमेकांच्या जीवावर उठू लागले. काही जण रांगेत अगदी कासवासारखे चालत होते तर इतर काही उग्र प्रकारचे लोक शांत लोकाना उचलून हवेत भिरकावून देत होते. ते इमारतींना आपटून खाली पडत होते. आणि उग्र लोक रांगेत सगळ्यात पुढे जाण्यास धडपडत होते. सगळे उग्र लोक अचानक एकमेकाना भिडले आणि एकमेकांना हवेत भिरकावून देवू लागले. हवेत सुद्धा मारामारी करू लागले.
काही ठीकाणी उलट चित्र होते. वर्सोवा मधील किरणला सकाळी सात वाजता एके ठीकाणी मुलाखतीस जायचे होते. सातची बेल वाजल्यानंतर बेडवरून उठून उभे राहाण्यासाठी तो प्रयत्न करायला लागला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याची हालचाल इतकी मंदावली की त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. साडेसात वाजून गेले तरी तो फक्त उठून उभे राहू शकला. अशा पद्धतीने त्याची हालचाल मंदावली होती की जणू काही एक चालते बोलते प्रेत! त्याला ब्रश पर्यंत पोहोचायला साडेआठ वाजले होते. त्याचे रूम मेट्स सकाळीच निघून गेलेले होते. कुणी त्याला असे हळू चालतांना पाहिले नाही....किरण पुढे रस्त्यावर दुपारी दिसायला लागला. बसमध्ये त्याला चढणे शक्य होते नव्हते....
किरणला समजेचना की त्याची हालचाल का मंदावली?
आणि मग व्हायचे तेच झाले!!!
सार्वजनिक ठीकाणी घडलेल्या अशा विचित्र अजब गोष्टी विक्रम टी.व्ही. वर बघत होताच... न्यूज चैनेल च्या न्यूज रूम मध्ये असेच काहीतरी चित्र होते. बातमीदार धावत पळत, खुर्च्यावरून उद्या मारत बातम्या सांगत होता...
विक्रम: "डॅन, तिकडे अमेरीकेत काय चाल्लंय? सारखंच आहे का?"
डॅनः "थोड्या फार फरकाने असेच चित्र आहे. मित्रा. विधाता असे खेळ का खेळतो आपल्याशी?"
विक्रम: "मित्रा आठव ते दोन घड्याळांचे चित्र. प्रत्येक आकड्याच्या ठीकाणी एकेक ग्रह. माया सभ्यता चे लोक थोडेफार अंदाज बांधू शकले. पण त्यांचा काळाचा अंदाज चुकला. आणि त्यांनी फार संकुचीत विचार केला. पण अग्रनामी या साधूने अनेक भिंतींवर लिहून ठेवलेले ते सर्व्....त्याचा अर्थ आता लागतोय असे वाट्ते आहे. "
डॅनः "विक्रम! अजून निष्कर्षा पर्यंत पोहोचण्या आधी शास्त्रज्ञांचे अवकाश निरिक्षणाचे अहवाल येवू देत...."
*****
सन 1011 च्या आसपासचा काळ..
प्राचीन भारतात एका पर्वतरांगांजवळच्या गुहेत-
दोन साधू तपश्चर्या करत होते. लोक म्हणत ते सिद्ध पुरुष होते. आजच्या विज्ञालाही शक्य नसेल एवढे वेगवेगळे शोध त्यांनी केवळ मनाने लावले होते असे ही ऐकीवात होते. आपले मानवी मन मोठे अजब असते. क्षणत इथे तर क्षणात दुसरीकडे. त्यापैकी अग्रनामी हा साधू कित्येक दिवसापासून ध्यान लावून बसला होता. अनेक म्हणत की तो भविष्य जाणतो.
तो जेव्हा डोळे उघडेल तेव्हा नक्की सगळ्यांना काहीतरी अभूतपूर्व घडणार होते हे नक्की!!!!
अनेक दिवसांच्या तपश्चर्येनंतर त्याने डॉळे उघडले. त्याच्या डोळ्यात भीतीदायक चमक होती. त्याच्या अंतर्मनाने जे पाहीले ते असे होते की त्यानंतर पुढे बघण्याची त्याची इच्छा उरली नव्हती. फक्त त्याचा शिष्य चक्रवाणी याला त्याने ते सांगितले.
अग्रनामी ने अशी सिद्धी मिळवली होती की तो विचारांद्वारे मनाला काही मिनिटांत अंतराळात कोठेही पोहोचवता येत असे. ती सिद्धी ते शिष्याला शिकवीतच होते, पण त्या दिवशी त्यांनी जे पाहिले त्यानंतर ते पाहिलेले शिष्याला सांगून ते समाधिस्थ झाले. चक्रवाणी याने ते प्रचंड मोठ्या नवग्रह मंदिरावर ते लिहून ठेवले. अनेक मजली दगडी मंदिर. त्याच्या अनेक भिंतींवर ते लिहिले गेले.
भाषा सांकेतीक! जोडीला ते चिन्ह. दोन घड्याळ आणि प्रत्येक आकड्याचा ठीकाणी ग्रह.....
****
समाधिस्थ होण्याआधी अग्रनामी साधूने जी तपश्चर्या केली त्यात त्याला अनेक गोष्टी दिसल्या. त्याने डोळे मिटले.
डोळे मिटताच एक अजब अंधार! मग त्याने मनातले सगळे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला बराच प्रयत्न करावा लागला. चार ते पाच प्रहर उलटून गेले. तेव्हा कुठे मनातले सगळे विचार नाहीसे झाले. ही विचार नष्ट करण्याची पद्धत त्याने अनेक वर्षांच्या अथक तपातून साध्य केली होती. मनावरचे विचारांचे दडपण दूर झाले होते. आता मन भरारी मारण्यासाठी सज्ज झाले होते. मनावरचे विचार दूर झाले की त्याचे जडत्त्व कमी होवू लागते. ते वातावरणात सहजगत्या संचार करू शकते हे त्या साधूला समजले होते. या आधी सुद्धा त्याने मनाला पृथ्वीवरच्या अनेक ठीकाणी नेले होते. अगदी समुद्राच्या तळाशी असलेले जीव तो सहजगत्या मेंदूवरच्या पटलावर बघू शकत होता. आकाशातल्या ग्रहतार्यांपर्यंत तो जावू शकत होता. अगदी चंद्रावरची माती जवळून बघू शकत होता. आपल्या सूर्यमंडलाच्या ग्रहचक्रात फिरून झाल्यावर मात्र त्याला आणखी बाहेर जाणे जमले नव्हते.....
पण त्या दिवशी त्याच्या मनाने आपल्या सौर मंडलाच्या पलिकडे भरारी घेतली...
सौर मंडलाला भेदले. त्या पलीकडे त्याचे मन प्रवास करू लागले.
आपला एक सूर्य पार करून अनेक पोकळ्या पार केल्या.
त्याला कळत होते की या विश्वाला अंत नाही. पण कुठपर्यंत अंत नाही? अंतालाही काहीतरी अंत असायला हवा ना! आपण अंत हा शब्द वापरतो तेव्हा कुठेतरी सुरुवात झाली असते असे आपल्याला अपेक्षीत आहे. तरच अंत असतो. सुरुवात नसेल तर अंत कसला?......
साधूचे मन प्रवास करत होते........
तसे पाहीले तर या विश्वाची सुरुवात कुठे आहे हेच आपल्याला माहिती नाही.
आपण राहातो ती पृथ्वी या विश्वात नेमकी कुठे आहे. माहीत नाही. आपण पॄथ्वीवर राहातो म्हणून आपणाला ती सुरुवात वाटते. या विश्वात इतर ग्रहंवर जीव आहेत असे आपल्याला वाटते. पण पॄथ्वीवरच्या सजीव निर्जीव व्यक्तींबाबत ज्या घटना घडतात त्या नेमक्या कोणत्या नियमानुसार घडतात? त्यासाठी कुणीतरी विश्व कर्त्याने काहितरी संगणकासारखी प्रोग्रामींग (विधिलिखीत- आज्ञा प्रणाली) करून ठेवली असेल का?
साधूचे मन प्रवास करत होते........
तर साधूचे मन प्रवास करत करत अवकाशात अनेक प्रकाशवर्षे अंतर पार करून गेले तेव्हा त्याला पुन्हा एक सूर्यमंडल दिसले.
तीच आपली पृथ्वी. तेच ते ग्रह. त्या पृथ्वीवर तेच ते ओळखीचे प्रदेश? साधू आश्चर्यचकीत झाला. आपली साधना चुकून आपण पुन्हा पॄथ्वीवर आलो असे त्याला वाटू लागले. पण त्याने जेव्हा निराश होवून मनाला आपल्या स्वतःच्या राहाण्याच्या जागेवर आणण्याचा प्रयन्त केला. तेव्हा त्याला तो स्वतः दिसला पण तो तपश्चर्या करतांना न दिसता त्याची समाधी दिसली... ते साल होते 1012!
काळाच्या पुढची घटना आपल्याला आताच कशी दिसली? म्हणजे अनेक अंतर आकाशात पार करुन गेल्यावर पुन्हा काळाच्या पुढे असलेली सौरमंडलाची हीच रचना विधात्याने करून ठेवली आहे? हीच रचना. तेच. फक्त काळाच्या पुढची? म्हणजे त्या विश्व कर्त्याला लक्षात ठेवायला सोपे जावे?
मग हे सौरमंडल पार केल्यावर आणखी अंतर गेल्यावर या पुढचे बघायला मिळेल? अनंत वेळा असे घडेल?
म्हणजे, असे तर नाही की अनेकांना भविष्याचा पूर्वाभास जो होत असतो तो आपले मन आपल्या नकळत एखाद्या अवकाशातल्या कुठेतरी आत्ता सुरु असलेल्या पुढच्या अवकाश पटलात जाते म्हणूत तर होत नसावी ना?
म्हणजे, एरवी भविष्यात ज्या घटना घडलेल्याच नाहीत त्यांचा अंदाज कुणाला येईलच कसा?
तसा तो ग्रहांच्या भ्रमणाद्वारे ज्योतीषी काढतातच?..
बरोबर!
ग्रह...
विधिलिखीत...
ग्रहरचना बदल?
त्या साधूने पुन्हा मनाला अवकाशात पुढे नेले.
1012, 1013, 1014, .... 2000, 2001, ...2015, 2016, 2017 साल....
अशा काही अनेक सौर मंडल ओलांडल्यानंतर त्याला मग सौर मंडल रचने मध्ये बदल घडलेले दिसू लागले. डोळे बंद असतांनाच त्याने खुणेद्बारे त्याने जे पाहिले ते तो घड्याळाच्या चिन्हांच्या रुपात लिहू लागला. त्यावेळेस पृथ्वीवर कोणता काळ आहे हे तो बघून ठेवून लिहू लागला. कारण त्याने सगळे शिकून घेतले. क्षणांत. मनाद्वारे. सिद्धीद्वारे!
म्हणजे सगळे काळ आत्ता वर्तमानातच घडत आहेत? सगळे पुढचे मागचे आता आजच घडते आहे?? ....
पण डोळे उघडण्या आधी त्याने शेवटची सौर मंडलाची जी रचना पाहीली त्यामुळे त्याला पुढे काहीही बघण्याची इच्छा राहीली नाही. तो काळ होता 2050...
त्या काळात ग्रहरचना अद्भुत होती. जशी कधीच नसावी असे आपणाला वाटेल, अगदी तशीच ती होती.
म्हणजे विश्वकर्त्याला लगेच एकाच रचनेवर समाधान मानून लगेच 2012 मध्ये जग नष्ट करायचे नाही.
अनेक प्रयोग त्याला करून बघायचे आहेत.काय होती ती रचना? काय पाहिले असावे त्या साधूने? ....
त्या नवग्रह दगडी मंदिरावर कोरलेले ते चिन्ह आणि सांकेतीक भाषांचे फोटो आपल्या लॅपटॉपवर विक्रम 2050 साली बघत होता. ते वेगळेच बाळ! ती लोकांची नष्ट होत चाललेली सहाशीलता? घडणार्या विचित्र घटला? अचानक हींसक होवू लागलेले लोक? अवकाश निरिक्षणाचा अहवाल आला की कळेलच...!!
****
1011 साली अग्रनामी साधूने डोळे उघडण्या आधी जे पाहीले ते आश्चर्यकारक होते. तो मनाद्वारे ज्या सूर्यमंडलात पोहोचला होता तो आजच्या काळाच्या बराच पुढचा काळ होता. पण तो आजच घडत होता. काळ बदललेल्या ग्रहांचे ते भविष्य दर्शवणारे आरसे होते.
कालग्रहांचे भविष्य आरसे.
हे सर्व होते दूरवर कोठेतरी या अमर्यादीत आकाशात। जेथे कुणालाच व्यक्तीशः पोहोचणे केवळ अशक्य होते.
त्याच्या शिष्याला - चक्रवाणी याला त्याने सर्व वर्णन करुन सांगितले होते. आणि डोळे बंद असतांना सगळे काळ बघता बघता चिन्हांच्या स्वरूपात लिहून ठेवले होते. मग त्याला 2050 सालच्या सौर रचनेत कोणते बदल दिसले?
तो सूर्यमंडलात शिरला. नेहेमी प्रमाणे त्याला ग्रह दिसू लागले.
सुर्याभोवती फिरणारे ग्रह. कोणते ग्रह होते ते? कशी रचना होती? पहिला ग्रह दिसला शनी! नेहेमीचाच. भोवताली कडे असलेला. निळाशार. गर्द गूढ वातावरण असलेला. अगदी तसाच जो सध्या सुरु असलेल्या कालचक्रा मध्ये आहे.
थोडे पुढे गेल्यावर त्याला दिसले की पुन्हा आणखी एक शनी ग्रह तेथे आहे. पुन्हा आणखी एक. एकूण चार शनी ग्रह.
पुढे गेल्यावर होता मंगळ! त्याच्या वातवरणात लालजर्द ज्वाळा. तांबूस भडक वातावरण.
पुन्हा एक मंगळ.
पुन्हा एक मंगळ.
एकूण तीन शनी आणि सहा मंगळ अशा ग्रहांनी बनलेले ते सौरमंडल होते ते.
पृथ्वीचा उपग्रह चंद्रही होता.
गुरु, बुध, शुक्र वगैरे नव्हते!!
असे सौरमंडल ज्यात पृथ्वी वर प्रभाव होता फक्त चंद्र, शनी आणि मंगळ या ग्रहांचा.
2050 नंतर त्याने डोळे न उघडता आणखी पुढे जाऊन बघीतले असते तर कोणती रचना असणार होती? नऊ ग्रहांच्या मिळून विधात्याला आलटून पालटून अनेक रचना करता येतील. मग त्याला सगळे प्रयोग करून बघायचेत का? नऊच का? आपल्याला ज्ञात असलेल्या ग्रहांपेक्षाही वेगळे गुणधर्म असलेले ग्रह नऊ मध्ये मिळवून तो नवी रचना बनवू शकतो. साधूने शेवट्चा जो काळ बघितला तो होता हाच. 2050. जेव्हा पृथ्वीवरच्या प्राणिमात्रांवर फक्त प्रभाव होता मंगळ आणि शनी या ग्रहांचा.
म्हणजे माणसांमधली कला संपली होती.
माणसांमधली सहनशीलता संपली होती.
स्त्री-पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण संपले होते. उरले होते फक्त मंगळाचे धडाडी चे लढाऊ गुण आनी शनी चे वैराग्य, शंतपणा, प्रत्येक गोष्टीला वेळ लावण्याची वृत्ती....
आणि??? ज्याच्यावर ज्या ग्रहाचा प्रभाव जास्त तो त्याप्रमाणे वागणार.
आणि अशी रचना झाल्यानंतर जन्मलेले सगळे नवे बालक? त्यांच्या तर बालपणापासूनच शनी किंवा मंगळ याचेच फक्त गुणधर्म असणार. त्यांची शरीर रचना सुद्धा बदलेल का?
***
साल 2050....
अवकाश संशोधनाचा अहवाल ही यालाच पुष्टी देत होता. सॅटेलाईट द्वारे चित्र मिळाले होते. डॅनियलने हे विक्रमला सांगितले. शास्त्रज्ञ आश्चर्यचकीत होत होते. विक्रमच्या लॅपटॉपवर ते चित्र मोठे होत होते.
त्यात साधू च्या शिष्याने मंदिरांच्या भींतीवर कोरलेल्या त्या दोन, एकमेकांच्या आरशातल्या प्रतिकृती वाटणार्या त्या घड्याळात काय होते? प्रत्येक आकड्याच्या ठीकाणी एकेक ग्रह. 12 च्या जागी आपली पृथ्वी. 11 च्या जागी चंद्र. 1 च्या जागी सूर्य आणि इतर ठीकाणि फक्त शनी आणि मंगळ.
पण मग आतापर्यंत विक्रम आणि डॅनियलवर तसा प्रभाव का पडला नाही. ते कोण होते? कोठून आले होते?
****
टी.व्ही वर प्रसिद्ध संगीतकार के. के. अरमान यांची मुलाखत सुरु होती. त्यांना आलेले अनुभव अविश्वसनिय होते. ते प्रसिद्ध संगितकार मन मोकळे करु लागले, "संगीत कसे बनवायचे हे मला समजेचना. अशी भावना मी आयुष्यात प्रथमच अनुभवतो आहे. जे काही मी आतापर्यंत बनवले ते मला आठवते आहे. पण मी जेव्हा एखादी नवी रचना करायला सुरुवात करतो आहे, तेव्हा माझ्या लक्षात आले की..."
असे म्हणत ते कुठेतरी शून्यात हरवल्यासारखे वाटत होते, त्यांचे मन कोठेतरी हरवल्यासारखे वाटत होते.
हताश मनाने ते पुन्हा सांगू लागले, "ह्म्म, माझ्या लक्षात आले की, मला स्वर आठवत नाहीत.. सूर, लय, ताल, सगळे हरपले आहे...जगाचा तालच काहीतरी बिघडतो आहे. मी सन्यास घेतो आहे. मला काही सूचत नाही. त्यापेक्षा मी सैन्यात जाणे पसंत करीन..."
असे म्हणून त्यांनी पत्रकाराला थप्पड मारली आणि ते संतापून निघून गेले. प्रतिक्रीया अतिशय अनपेक्षीत अशी होती. बहुतेक संगितकारांचा हाच अनुभव होता. बरोबर! लढाऊपणा हा मंगल ग्रहाचा गुण! म्हणजे शुक्र ग्रहाचा कलेचा प्रभाव जाऊन त्याचेवर कमीत कमी तीन मंगल ग्रहांचा प्रभाव पडला असावा!
विक्रम हे सर्व डॅनियलशी बोलता बोलता टी.व्ही. वर बघत होता. चित्रकार सुरेश संत यांची खंत सुद्धा अशीच काहीतरी होती. चित्र काढणेच त्यांना जमेना. चित्र काढायला कागद घेतला की मेंदू काही नवे रचनात्मक सुचवण्यापलीकडे गेल्या सारखा त्यांना वाटत होता. कुंचल्याने अक्षरशः वेडया वाकड्या रेघोट्या मारता येण्या पलिकडे त्यांना काही करता येत नव्हते! त्यांनी सगळे कागद भराभर फाडून टाकले. कूंचल्यांचे तुकडे केले.
काय ते चित्र काढायचे? काहीतरीच काय? ...
अभिनय क्षेत्रांतले कलाकार अभिनय विसरले.
अभिनया सारखी निरर्थक गोष्ट दुसरी कुठ्ली नाही असे त्यांना प्रकर्षाने जाणवत होते.
साहित्यिक लेखन कला विसरत चालले. टि.व्ही. वर ज्योतिषी वेगवेगळे तर्क लढवू लागले आणि एकमेकांशी सुद्धा लधू लागले.
परिणाम हळू हळु जाणवायला लागला होता. राजकारणात पक्षनेते एकमेकांवर शाब्दीक चिखलफेक करूलागले.
नंतर पावसात बाहेर येवून एकमेकांवर खरोखरीचा चिखल फेकू लागले. एकमेकांना मारहाण करू लागले.
बर्याच लोकांनी आपापल्या धार्मिक स्थळांत जाऊन प्रार्थना सुरु केल्या. पण प्रार्थनेत मन रमेचना.
शनी प्रभावीत लोकांना वैराग्य घ्यावेसे वातू लागले, काही पाताळयंत्री डावपेच आखू लागले.
मंगळ प्रभावीत लोक शस्त्रे घेवून एकमेकांवर धावून गेले.
मानवातील कला हरपली होती.
शुक्र ग्रहच नाहीसा झाला होता व कसा झाला ते एक गूढ, एक कोडे होते.
पण तो झालेला होता हे खरे.
बुध, गोड वाणीचा ग्रह हरपला. लोकांचा संवादावरचा विश्वास उडाला.
या दिवसांत जी बालके जन्मली ती सगळी आश्चर्यकारक होती.
गुरू नव्हता. कुणी कुणाचे मार्गदर्शन घेईनासे झाले।
आशावाद नाहीसा झाला. पुस्तके फेकली जावू लागली
काही दिवस गेले....
मुंग्यांची लय विसरलि गेली. पक्ष्यांचे थवे वेडेवाकडे उडू लागले. मधमाशा फुलांतून रस काढायला विसरल्या.
एव्हाना शास्त्रज्ञांचा अहवाल आला व तो टि.व्ही. वरून जाहीर व्हायला लागला.
लोक आश्चर्यचकीत होतच होते.
अवकाशातली ग्रहरचना बदलल्याचे टि.व्ही. वर जाहीर झाले.
काही व्यक्तींवर कुंडलीतल्या सध्याच्या ग्रहस्थितिप्रमाणे होत होता...
एकमेकांचे हितशतत्रू असलेले देश, त्यांचे संरक्षणमंत्री यांच्या डोक्यात युद्धाच्या कल्पना साकारू लागल्या.
त्या अंमलात आणल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली. काही देशांनी युद्ध पुकारण्याची शक्यता निर्माण होवू लागली. सगळे बघून आत्मघातकी प्रवृत्ती वाढल्या. पुरुष स्त्री एकमेकांशी लढायला लागले.
हॉटेलमधले, घरातले स्वयंपाकाचे पदार्थ कसेही वाढण्यात येवू लागले. त्यातली चव नष्ट झाली.
काहीतरी विचित्र घडत होते.
डॅन: "विक्रम तुला निघायला हवं"
विक्रम: "काही तरी करायला हवे, लोकांना वाचवायला हवे, काय करता येईल..?"
डॅन: "विक्रम, वेडा आहेस का? आपल्याला उशीर झाला आहे. तू यात गुंतू नकोस, तू ग्लोबल व्हेरीएबल आहेस हे लक्षात ठेव. तुला आपल्या मुक्कामाला निघायला हवं..."
विक्रम: "मी बघतो, पोहोचण्याचा प्रयत्न करतो...तिथपर्यंत!"
विशिष्ट चष्मा लावला तरच स्क्रीनवरचे दिसेल अशा प्रकारचा तो लॅपटॉप होता. म्हणजे ते इतरांना दिसू शकत नसे. विक्रम समोर आता अव्हान होते. या सगळ्यातून वाचून "त्या" मुक्कामाला पोहोचण्याचे. तेथून सुरु होणार होता आणखी एक प्रवास..तो कारमध्ये बसला...त्याची कार रस्त्यावरून धावू लागली.
रस्त्यावर अपघात होत होते. काही दिवसांपूर्वी जन्मलेली बालके दोन वर्षाच्या मुलांसारखी दिसत होती. आणि ती रस्त्यावर उतरून तोडफोड करू लागली. ती दिसायला अद्भूत होती. डोके वेगळेच होते. ते एक प्रकारे एलियन दिसत होते. म्हणजे माणसांची पुढची पिढी म्हणजेच एलियन आहेत? नवी उत्क्रांती? तेच तर उडत्या तबकड्यांद्वारे "आताच्या पृथ्वीवर येण्याचा प्रयत्न करत नसावेत? त्यांच्यात प्रचंड ताकत होती. ती बालके कार, मोटारसायकल आपल्या चार हातांनी उचलून फेकून देवू लागली.
एका बालकाने विक्रमची गाडी उचलली आणि आकाशात भिरकावली.....
****
तत्पूर्वी....
2012 साली सगळे जग नष्ट होणार असे माया सभ्यतेच्या लोकांनी सांगून ठेवल्यामुळे आणि प्रसार माध्यमांनी त्याला अवाजवी प्रसिद्धी दिल्याने सगळ्या जगावर भीती चे सावट पसरले होते. भूकंपांचे, ज्वालामुखींचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ते सर्वांना खरे होईल असे वाटत होते. 2012 च्या त्या तारखेला मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही.
मात्र विक्रमला भारतात उत्खननात सापडलेल्या त्या कालग्रहांच्या भविष्य आरश्यांवर दाट विश्वास होता.
त्याचा वैज्ञानिक मित्र डॅन याने त्याला अमेरिकेत बोलावले. अनेक ज्योतिषी लोकांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांना गुप्ततेचे आव्हान केले गेले होते. अमेरिकेत एका गुप्त ठीकाणी उभारलेल्या वैज्ञानिक संशोधन केंद्रात सर्व 2017 साली वैज्ञानिकांनी एक अभूतपूर्व शोध लावला होता. जग नष्ट झाले तरीही त्या शोधाचा उपयोग होणार होता- प्रलयापासून वाचण्यासाठी.
एक असा शोध जो आज सगळ्यांना स्वप्नवत वाटला असता. वस्तुमानाचे रेडीओ लहरीत रुपांतर! एखाद्या जीवंत माणसाला रेडीओ लहरींमध्ये रुपांतरीत करुन रेडीओ लहरी अवकाशातल्या गुप्त स्पेस स्टेशन मध्ये पाठवून पुन्हा त्याला मुळ रुपात आणायचे. मग त्याला ग्लोबल व्हेरीएबल म्हणायचे. पण एका खास मशीनद्वारेच ते शक्य होते. सामान्य माणसांपासून आणि इतर सरकारी वैज्ञानिक संशोधन केंद्रांपासून अतिशय गुप्तपणे हे केंद्र उभारण्यात आले. मग कालग्रहांच्या भविष्य आरश्यांबद्दल संशोधन सुरु झाले, कालग्रहांच्या पुढच्या काळातल्या पृथ्वीवर जाणेही शक्य झाले. विक्रम त्यातला पहिला प्रयोग!
डॅनने विक्रमला 2050 सालच्या कालग्रहावर (पृथ्वीवर - भारतात) पाठवले.
2017 चा डॅन 2050 च्या विक्रमशी सम्पर्क साधू शकला. विक्रमजवळ असलेल्या अतिवेगात्मक रेडिओ लहरी पाठवण्याच्या तंत्रामुळे तो त्याद्वारे 2050 सालाची दृश्ये 2017 साली बघू शकला.
अति सामर्थ्यवान अशा त्या अनेक मंगळ प्रभावीत बालकांनी विक्रमची गाडी उचलून हवेत भिरकावून दिली.
शक्य तितके 2050 सालाच्या पृथ्वीचे रस्त्यावरचे व्हीडीओ विक्रमने तोपर्यंत 2017 मध्ये ट्रान्स्मीट केले होतेच. आता वेळ होती बटण दाबण्याची. गाडी हवेत गटांगळ्या खात होती. पण विक्रमने ते बटण दाबले...
कारण 2050 साली आता जास्त मुक्काम करण्यात अर्थ नव्हता....
मात्र कालग्रहांचे भविष्य आरसे खरे आहेत हे मात्र सिद्ध झाले होते. तेवढे तात्पुरते पुरेसे होते...
काही दिवसांपूर्वी जन्मलेली बालके दोन वर्षाच्या मुलांसारखी दिसत होती.आणि ती रस्त्यावर उतरून तोडफोड करू लागली. ती दिसायला अद्भूत होती. डोके वेगळेच होते. ते एक प्रकारे एलियन दिसत होते. त्यांच्यात प्रचंड ताकत होती. ती बालके कार, मोटारसायकल आपल्या चार हातांनी उचलून फेकून देवू लागली. एका बालकाने विक्रमची गाडी उचलली आणि आकाशात भिरकावली. पण विक्रम रेडीओ लहरींत रुपांतरीत झाला आणि गाडी रस्त्यावर आदळून दूरवर फरफटत गेली....आणि गाडीने पेट घेतला!!!!
***
2017 सालच्या कालग्रहावर विक्रम परतला. विक्रमचे स्वागत झाले. विक्रमने आपले अनुभव सगळ्यांशी शेअर केले.
काही दिवसानंतर..
विक्रम: "मला एका गोष्टीचे वाईट वाटते. कुणाच्याही डोळ्यात काही वेळाकरता इमेज टाकण्याचे ते यंत्र मात्र गाडीसोबत नष्ट झाले"
डॅन: "ते पुन्हा बनवता येईल. पण विक्रम, एक सांगू? एक मस्त कल्पना आहे. कालग्रहावरच्या आणखी का ठीकाणी जातोस का?"
विक्रम: "कुठे?"
डॅनः "साधूने पाहिलेल्या अनेक जगांपैकी एक जग! तेथे फक्त आणि फक्त शुक्र ग्रहाचे राज्य आहे! नऊ शुक्र ग्रह. आणि एक चंद्र! बस्स!"
विक्रम: "कसे असेल ते जग? सौंदर्याने ओतप्रोत भरलेले, सगळीकडे शांतता असलेले? की आणखी वेगळे? "
डॅन: "ते तेथे गेल्यावरच कळेल."
विक्रम: "तेथे आपण दोघे जावूया... पुढच्या महिन्यात! पण मी एक सांगू का? हे सध्याचे जगच चांगले आहे. जगात सगळे काही आवश्यक आहे. सगळ्या ग्रहांचे सगळ्या प्रकारचे गुणधर्म आवश्यक असलेले लोक असावेत. नाहीतर?"
(कथा समाप्त पण अज्ञात भविष्याचा प्रवास सुरुच!)
(सुचना: ही कथा मी पूर्वी लिहिलेल्या "कालाग्रहांचे भविष्य आरसे" या कथेची सुधारित आवृत्ती आहे. ज्योतिष आणि विज्ञान यांचा संयोग असलेली ही जगातली पहिली कथा असावी असा माझा अंदाज आहे. चूक भूल द्यावी घ्यावी! )

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.