जसे आपले वर्तमानपत्र रोजच्या "खर्‍या" घडलेल्या घटना आपल्यापर्यंत पोचवते, तसेच ....
प्रस्तुत आहे- चित्रमानपत्र
म्हणजे काय? असे विचारता?
सांगतो. अहो, कल्पना करा की चित्रपटंमध्ये ज्या घटना घडतात, त्या प्रत्यक्ष घडताहेत असे आपण क्षणभर मानले तर त्याच्या बातम्या कशा तयार होतील याची कल्पना मी केली आणि त्या बातम्या छापणारे म्हणजे- "चित्रमानपत्र" .
रणरणत्या उन्हात हास्याचा विरंगुळा निर्माण करण्याचा हा माझा अभिनव प्रयत्न...
आवडला किंवा नाही जरूर कळवा...
----------------------------------
सिंगापूरमध्ये अज्ञात इसमाने केला हेलीकॉप्टरचा थरारक पाठलाग!
कारण अद्याप गुलदस्त्यात!
दि-९- (आमच्या सींगापूरी प्रतिनिधीकडून)-
आज सकाळी दहा वाजता एक काळा मुखवटा घातलेला भारतीय मनुष्य जीवाच्या आकांताने एका हेलीकॉप्टरचा पाठलाग करतांना आढळला. तो थांबून थांबून उड्या मारत होता.
एका स्कूलबस जवळून जातांना त्याने त्यातला लहान मुलांना हात हलवून टाटाही केले. बसमधील मुले त्याला "क्रीश, क्रीश" असे संबोधत होती. या प्रकरणाने सिंगापूर पोलीस संभ्रमीत झाले असून त्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे पोलीसांनी ठरवले आहे. तो माणूस काही वेळानंतर पाण्यात गायब झाला असून ते हेलीकॉप्टरही दिसेनासे झाले आहे. ते हेलीकोप्टर डॉ, सिद्धांत आर्य यांचे असल्याचे समजते.
या नंतर काही वेळातच एका जंगलात काही चायनीज लोकांचे मॄतदेह मिळाले असून त्या काळ्या इसमाने त्यांना मारले असावे असा पोलीसांना संशय आहे. पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे....
-------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel