नटसम्राट हा एक अप्रतिम चित्रपट आहे. कालच बघितला. कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कथा अप्रतिम आणि तितकेच महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन सुद्धा उत्तम!

मी नटसम्राट नाटक बघितलेले नाही आणि नाटक वाचलेले सुद्धा नाही. म्हणून मनात कसलीही तुलना न करता हा चित्रपट मी बघू शकलो. अशा प्रकारच्या कथा असलेले इतर अनेक मराठी हिंदी चित्रपट येऊन गेले.
(उदा. राजेश खन्नाचा अवतार, सुलोचना चा मराठी चित्रपट एकटी, अमिताभचा बागबान, माझं घर माझा संसार, लेक चालली सासरला, माहेरची साडी वगैरे)

पण "नटसम्राट" हा अनेक बाबतीत मला "वेगळा" वाटला. यात कुणा एकाचीच बाजू बरोबर आणि एकाची चूकच असा पूर्वग्रहदूषित विचार लेखकाने केलेला नाही. तसेच मुलगा-सूनच फक्त नेहेमी चूकतात आणि लेक-जावई नेहेमी बरोबरच असतात असा एकतर्फी विचार सुद्धा यात मांडलेला नाही.

आजकाल एकीकडे सोशल मिडियावर "मुलगी-जावई हे महान देवी देवता असतात आणि मुलगा-सून हे नालायक राक्षसांचे अवतार असतात" अशा प्रकारचे जे चूकीचे, विषारी आणि अतिरेकी विचार फैलावले जात आहेत, त्याला छेद देत नवे विचार या चित्रपटाने मांडले आहेत.

"मुलगा किंवा मुलगी हे केवळ त्यांच्या लिंगभेदाने चांगले किंवा वाईट ठरत नसून त्यांच्या स्वभावानुसार आणि कर्मानुसार ते चांगले किंवा वाईट ठरत असतात"

"जुनी पिढी नेहेमी बरोबरच असते आणि नवी पिढी नेहेमी चूकच असते असे न म्हणता, त्यांच्या स्वभावानुसार आणि कर्मानुसार ते चूक किंवा बरोबर ठरत असतात"

हा चित्रपट मानवी स्वभावाच्या हटवादीपणा आणि तत्वांचा संघर्ष दाखवतो जो नव्या पिढीतल्या दोन कुटुंबात सुद्धा घडू शकतो किंवा जुन्या पिढीतल्या दोन कुटुंबात सुद्धा घडू शकतो.

या चित्रपटात कशावरही भाष्य केलेले नाही. फक्त घडणार्‍या घटना तटस्थपणे दाखवल्या आहेत, त्याबद्दल कुसुमाग्रज आणि महेश मांजरेकरांचे अभिनंदन!

"पिढी, वय किंवा लिंगभेदानुसार कुणी चांगला-वाईट किंवा चूक-बरोबर ठरत नसतो तर ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार आणि कर्मानुसार ठरतो"

आणखी एक: मला अभिमान वाटतो की, माझा वाढदिवस महान लेखक कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी आहे. २७ फेब्रुवारी!!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel