(मी year २०१७ आणि त्यानंतर लिहिलेल्या चारोळ्यांचा संग्रह आहे!)
27-मे-2017
पावसा पावसा ये लवकर
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार

6-Jul-2017

विसरण्याची तुला
वेळ येते तोवर
का नियती आणते तुला
अचानक माझ्या समोर
***
आपले मिलन शक्य नाही हे जाणून
जेव्हा येते तुला विसरण्याची वेळ
तेव्हा तुला पुन्हा पुन्हा माझ्या समोर आणून
का खेळते नियती असा भावनेशी खेळ
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel