माहितीचा
अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व
या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक
नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये
सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची
माहिती घेता येते.
उदा.
कार्यालयाचे नाव, पत्ता,
दूरध्वनी
क्रमांक, कार्यालयाची
वेळ, जनमाहिती
अधिकार्यांची नावे, कार्यालयाची
कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे,
कार्यालयात
उपलब्ध असलेली माहिती, विविध
अर्जांचे नमुने, कर्मचार्यांची
नावे व इतर माहिती, उपलब्ध
निधी, लाभार्थ्यांची
यादी, योजनांची
माहिती, योजनांवर
अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत,
कर्मचार्यांचे
वेतन, अंदाजपत्रक
अशा प्रकारची माहिती घेता येते.