हेंचि दान देगा देवा । तुझ्या विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि सम्पदा । सन्त संग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावें आम्हांसी ॥४॥
*
भजन - जय विठ्ठल जयजय विठ्ठल ।
बोलिलीं लेंकुरें । वेडी वाकुडीं उत्तरें ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥२॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला॥३॥
तुका म्हणें ज्ञानेश्वरा । राखा पायां पैं किंकरा ॥४॥
*
भजन - ज्ञानदेव तुकाराम ।
झालें समाधान । तुमचे देखिले चरण ॥१॥
आतां उठावेसे मना । येत नाहीं नारायणा ॥२॥
सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥३॥
तुका म्हणॆ भोग । गेला निवारला लाग ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.