शंख चंद्रसूर्यासमान देवस्वरूप आहे. त्याच्या मध्यभागी वरुण, पृष्ठभागात ब्रह्मदेव आणि अग्रभागी गंगा व सरस्वतीचे वसतिस्थान आहे. त्रैलोक्यात जेवढी तीर्थे विराजमान आहेत, ती सर्व विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात. सूर्याच्या उष्णतेने ज्याप्रमाणे बर्फ वितळून जातो, त्याचप्रमाणे शंखाच्या केवळ दर्शनाने पापे नष्ट होतात, तर त्याच्या स्पर्शाने काय न साध्य होईल ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.