राणी पद्मिनी हिचा सुंदर चेहेरा काचेच्या प्रतीबिम्बत जेव्हा खिलजीने पाहिला, तेव्हा त्याने निश्चय केला की राणी पद्मिनीला काहीही करून मिळवायचेच. आपल्या शिबिरात परतत असताना खिलजी काही वेळ राजा रतन सिंहाच्या सोबत चालत होता. खिलजीने संधी साधून रतन सिंहाला बंदी बनवले आणि पद्मिनीची मागणी करू लागला. चौहान राजपूत सेनापती गोरा आणि बदल यांनी सुलतानाला हरवण्यासाठी खेळी खेळत खिलजीला संदेश पाठवला की पुढच्या सकाळी पद्मिनीला खिलजीच्या हवाली केले जाईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.