एखाद्या वयाने किंवा मानाने मोठ्या व्यक्तीला भेटताना त्यांच्या पाया पडण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे. लहान मुलांनाही हेच संस्कार शिकवले जातात जेणेकरून ते मोठ्यांचा आदर करतील. या परंपरेच्या संबंधी मान्यता आहे की मेंदूतून निघणारी उर्जा आपल्या हातांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीच्या पायांपर्यंत पोचते आणि समोरच्या व्यक्तीच्या पायांपासून त्याच्या हातांपर्यंत पोचते. आशीर्वाद देताना व्यक्ती चरण स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर आपला हात ठेवते, त्या हातांतून ती उर्जा पुन्हा आपल्या मेंदूपर्यंत पोचते. यामुळे उर्जेचे एक चक्र पूर्ण होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.