अपयश हे आपला आत्मविश्वास डळमळीत करू शकते. ते तुमच्या मनाची अशी धारणा करून देऊ शकते की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी लायक नाही आहात. अपयश हे तेव्हाच पदरात येतं जेव्हा तुम्ही एखादा धोका पत्करता किंवा अशी गोष्ट मिळावी पाहता जी मिळवणे अतिशय कठीण आहे. अपयशाशी दोन हात करत सफलता प्राप्त करण्यातच तुमची खरी परीक्षा आहे, आणि हे तुम्ही भूतकाळात अडकून पडलात तर कधीही करू शकणार नाही. एखादी कीमती वस्तू प्राप्त करण्यासाठी तुम्हाला टक्के-टोणपे खावे लागतील, धोका पत्करावा लागेल. तुमचे अपयाच तुमच्या योग्यतेवर डोईजड होऊ देऊ नका. जर तुम्ही नेहमी भूतकाळात अडकून पडलात तर तुमचा भूतकाळ हाच तुमचा वर्तमानकाळ बनेल, आणि तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही.
मला अशा आहे की वर दिलेला सल्ला ऐकून तुम्हाला नक्की लाभ होईल कारण मी वर्षानुवर्षे ही गोष्ट अंगिकारली आहे, आणि त्याने एक यशस्वी आंत्रपेन्यूर बनण्यात माझे सहाय्य केले आहे. यशाचे हे सूत्र अतिशय शक्तिशाली आहे आणि मी त्याच्यावर नेहमी मनन करतो.
आपल्या कारकिर्दीला आकार देताना आपण कोणते धडे घेतलेत? कमेंट्स मध्ये आपले अनुभव शेअर करा कारण त्यामुळे आपल्या सर्वांना एकमेकांकडून काही ना काही शिकायला जरूर मिळेल.
मी असे मानून चालत आहे की तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणेच आहात आणि तुम्हाला सल्ला देणारे कोणी नाही किंवा तुमच्या पाठीवर संपन्न पित्याचा हात नाहीये जे तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि आपली कारकीर्द सांभाळण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देतील. मी तुम्हाला माझे अनुभव सांगतो. जवळ जवळ २० वर्षांपूर्वी मी एका बॉस च्या हाताखाली काम करत होतो. एका सर्फिंगबोर्ड शॉप मध्ये काम केल्यानंतर मी माझा स्वतंत्र मार्ग निवडला आणि एका भागीदारासह आपली कंपनी चालू केली जेव्हा मी पदवीधर सुद्धा झालो नव्हतो.जेव्हा मी माझ्या पायांवर उभा राहण्यासाठी मार्ग निवडला तेव्हा माझ्या मनात आपल्या कारकिर्दीला एक जबरदस्त वळण देण्याची फार इच्छा होती आणि रिस्क घेण्याची क्षमता होती. त्या दिवसांत मला असेच वाटत असे की यशस्वी होण्यासाठी या गोष्टींची सर्वांत जास्त आवश्यकता होती. परंतु हे खरे नव्हते. मला सुद्धा मार्गदर्शनाची आवश्यकता होती. त्याच्या शिवाय पुढे गेल्यामुळे मला फार अवघड आणि कडवे धडे मिळाले. आज जेव्हा मी या गोष्टींवर विचार करतो तेव्हा मला याची जाणीव होते की ते सर्व आपल्यासाठी खूप मोठे रिमाइंडर्स आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.