ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
राशी स्वरूप- बैल, राशी स्वामी- शुक्र.
राशी परिचय
१. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल स्वभावानेच अधिक परिश्रमी आणि मोठ्या प्रमाणात वीर्यवान असतो, सामान्यपणे तो शांत असत, परंतु राग आल्यावर तो उग्र रूप धारण करतो.
२. बैलासारखाच स्वभाव ऋषभ राशीच्या लोकांत पाहायला मिळतो. राशीचा स्वामी शुक्र आहे.
३. याच्या अंतर्गत कृत्तिका नाक्षत्रःचे तीन चरण, रोहिणीचे चारही चरण आणि मृगशिराचे प्रथम दोन चरण येतात.
४. यांच्या जीवनात पिता - पुत्राचा कलह राहतो, यांच्या मनाचा ओघ सरकारी कार्यांकडे राहतो. सरकारी ठेकेदारीचे कार्य करण्याची योग्यता असते.
५. पित्याच्या जवळ जमिनी संदर्भात काम किंवा जमिनीच्या द्वारे उपजीविकेचे साधन असते. या लोकांना अधिक करून तामसी भोजन आवडते.
६. गुरूचा प्रभाव या लोकांमध्ये ज्ञानाच्या प्रती अहम भाव निर्माण करणारा असतो, तो जेव्हा कोणतीही गोष्ट बोलतो तेव्हा स्वाभिमानाची गोष्ट बोलतो.
७. सरकारी क्षेत्रातील शिक्षण आणि त्यांची कामे या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
८. कोणत्याही प्रकारे केतूचे बळ मिळाले तर जातक सरकारचा मुख्य अधिकारी बनण्याची क्षमता ठेवतो. मंगळाचा प्रभाव जातकामध्ये मानसिक गर्मी प्रदान करतो.
९. कारखाने, आरोग्यविषयी कार्ये आणि जनातेतील झगडे सोडवण्याचे कार्य हे लोक करू शकतात, यांच्या मातेच्या आयुष्यात समस्या फार असतात.
१०. हे लोक खूप सौंदर्य प्रेमी आणि कला प्रेमी असतात. कलेच्या क्षेत्रात नाव कमावतात.
११. माता आणि पती यांची साथ किंवा माता आणि पत्नी यांची साथ घरातील वातावरणात सामंजस्य आणते, या लोकांना आपल्या जीवनाच्या जोडीदाराच्या अधीन राहायला आवडते.
१२. चंद्र-बुध या लोकांना कन्या संतान अधिक देतात. मातेसोबत वैचारिक मतभेदाचे वातावरण बनते.
१३. यांच्या जीवनात व्यापारी यात्रा खूप घडतात, आपणच घालून दिलेल्या आदर्शांवर हे जीवनाची वाटचाल करतात.
१४. डोक्यात कायम कोणती ना कोणती योजना आकार घेत असते. कित्येक वेळा आपणच केलेल्या षड्यंत्रात आपण स्वतःच अडकतात.
१५. रोहिणीच्या चौथ्या चरणाचा स्वामी चंद्र आहे, यांच्या आतमध्ये नेहमी चढ-उताराची स्थिती राहते, हे लोक आपल्या मनाचे राजे असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel