ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
राशी स्वरूप- खेकडा, राशी स्वामी- चंद्र.
१. राशीचक्रातील चौथी रस कर्क. राशीचे चिन्ह आहे खेकडा. ही चर रास आहे.
२. राशीचा स्वामी चंद्र. हिच्या अंतर्गत पुनर्वसू नक्षत्राचे अंतिम चरण, पुष्य नक्षत्राचे चारही चरण आणि अश्लेषा नक्षत्राचे चार चरण येतात.
३. या राशीचे लोक कल्पनाशील असतात. शनी - सूर्य जातकाला मानसिक रूपाने अस्थिर बनवतात आणि त्याच्या मनात मीपणाची भावना वाढवतात.
४. जिथे कुठे तो कार्य करण्याची इच्छा धरतो, तिथे अडचणीच येतात.
५. शनी-बुध मिळून जातकाला हुशार बनवतात. शनी-शुक्र धन आणि संपत्ती देतात.
६. शुक्र त्याला साजाण्याची कला देतो आणि शनी अधिक आकर्षण देतो.
७. हे लोक उपदेशक बनू शकतात. बुध गणिताची जान आणि शनी लिखाणाचा प्रभाव देतो. कॉम्प्युटर प्रोग्रामर वगैरे बनण्यात यश मिळते.
८. जातक श्रेष्ठ बुद्धीवले, जल मार्गाने यात्रा आवडणारे, कामुक, कृतज्ञ, ज्योतिषी, सुगंधी पदार्थांचा शौकीन आणि भोक्ते असतात. हे मातृभक्त असतात.
९. कर्क, खेकडा जेव्हा एखादी वस्तू किंवा जीवाला आपल्या पंजात पकडतो तेव्हा त्याला सहजपणे सोडत नाही. त्याच प्रकारे या राशीच्या लोकांमध्ये आपले लोक आणि आपले विचार यांना चिकटून राहण्याची प्रबळ भावना असते.
१०. ही भावना त्यांना ग्रहणशील, एकाग्रता आणि धर्य्हे गुण प्रदान करते.
११. यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही. कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती अतिशय तीव्र असते.
१२. भूतकाळ यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. मैत्री आयुष्यभर निभावतात, आपल्या इच्छेचे स्वामी असत्तात.
१३. स्वप्न पाहणारे असतात, परिश्रमी आणि उद्योगी असतात.
१४. हे बालपणी दुर्बल असतात, परंतु वय वाढत जाते तसा शरीराचा विकास होत जातो.
१५. कर्क काळपुरूषाच्या वक्षस्थलाचे आणि पोटाचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे या लोकांना आपल्या भोजनाकडे नीट लक्ष देणे आवश्यक असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.