तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
राशी स्वरूप - विंचू, राशी स्वामी- मंगळ.
१. वृश्चिक राशीचे चिन्ह विंचू आहे आणि ही रास उत्तर दिशेचे द्योतक आहे. ही जलतत्वाची रास आहे. राशीचा स्वामी मंगल आहे. ही स्थिर राशी आहे, स्त्री राशी आहे.
२. या राशीच्या व्यक्ती उठावदार शरीरयष्टीच्या असतात. ही रास गुप्तांग, उत्सर्जन तंत्र आणि स्नायू तंत्राचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे मंगळाच्या कमकुवत स्थितीत या अंगांचे रोग लवकर होतात. हे लोक एलर्जीने सुद्धा बऱ्याचदा त्रस्त राहतात. विशेषकरून जेव्हा चंद्र कमकुवत असेल.
३. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये दुसऱ्यांना आकर्षित करण्याची चांगली क्षमता असते. हे लोक धीट, भावनाप्रधान असण्या बरोबरच कामुक सुद्धा असतात.
४. शारीरिक घडण चांगली असते.या लोकांची शरीरसंरचना चांगल्या प्रकारे विकसित असते. खांदे रुंद असतात. शर्रीरिक आणि मानसिक शक्ती भरपूर प्रमाणात असते.
५. या लोकांना मूर्ख बनवणे सोपे नसते, त्यामुळेच कोणीही सहज धोका देऊ शकत नाही. हे लोक नेहमी सरळ आणि योग्य सल्ला देण्यावर विश्वास ठेवतात. कधी कधी हे विरोधाचे कारण देखील बनू शकते.
६. हे लोक दुसऱ्याच्या विचारांना जास्त विरोध करतात, आपल्या विचारांच्या बाजूने कमी बोलतात आणि सहजपणे कोणताही मिसळत नाहीत.
७. हे लोक नेहमी विविधतेच्या शोधात राहतात. वृश्चिक राशीने प्रभावित मुले फार कमी बोलतात. ते सहजपणे कोणालाही आकर्षित करू शकतात. बारीक मुली यांना आकर्षित करून घेतात.
८. हे लोक एका जबाबदार गृहस्थाची भूमिका निभावतात. अति महत्त्वाकांक्षी आणि जिद्दी असतात. आपल्या मार्गावरूनच चालतात पण कोणाचाही हस्ताक्षेप सहन करत नाहीत.
९. लोकांच्या चुका आणि वाईट कृत्य चांगल्या लक्षात ठेवतात आणि वेळ येताच त्यांचे उत्तर देखील देतात. यांची वाणी कटू, राग धारदार असतो पण मन एकदम साफ असते. दुसऱ्यात दोष शोधण्याची सवय असते. तडजोडीच्या राजकारणात चतुर असतात.
१०. या राशीच्या मुली तीक्ष्ण निखत नजरेच्या असतात. त्या जास्त सुंदर नसल्या तरीही त्यांच्यात एक वेगळे आकर्षण असते. बोलण्या चालण्याचा त्यांचा एक स्वतःचा निराला असा ढंग असतो.
११. या बुद्धिमान आणि भावनाप्रधान असतात. यांची इच्छाशक्ती दृढ असते. स्त्रया जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी असतात. थोडी स्वार्थी प्रवृत्ती देखील असते.
१२. स्वतंत्र निर्णय घेण्याची यांना सवय असते. माहेरच्या परिवाराशी अधिक स्नेह असतो. नोकरी करत असतील तर आपले वर्चस्व राखतात.
१३. या लोकांमध्ये काम करण्याची क्षमता खूप जास्त असते. वाणीमध्ये कटुता यांच्यात दिसून येते, सुख साधनांची लालसा सदैव मनात राहतेच.
१४. हे सर्व लोक जिद्दी असतात, कामाच्या प्रती प्रामाणिक असतात, महत्त्वाकांक्षी असतात आणि दुसऱ्यांना प्रभावित करण्याची योग्यता यांच्यात असते. या व्यक्ती उदार आणि आत्मविश्वासी असतात.
१५. वृश्चिक राशीची बालके परिवाराशी अधिक स्नेह ठेवतात. कॉम्पुटर - टीव्ही यांची आवड फार असते. मेंदू तल्लख असतो आणि खेळाची यांना आवड असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.