भारतात सिंधू, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, कावेरी, गंगा, यमुना इत्येडी अनेक मोठ्या नद्या वाहतात. यांच्यापैकी नर्मदा फक्त उलट दिशेने वाहते. पुराणांत सांगितल्या प्रमाणे सिंधू, सरस्वती, गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा, महानदी, गोदावरी इत्यादींना सर्वांत प्राचीन म्हटले जाते परंतु सिंधू आणि सरस्वती सर्वांत प्राचीन आहेत. अर्थात आता सिंधू नदी पाकिस्तानात आहे आणि सरस्वती नदी लुप्त होऊन युगं लोटली. या दोन नद्यांच्या नंतर गंगा आणि नर्मदा अवतीर्ण झाल्याच्या कथा पुराणांमध्ये लिहिलेल्या आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.