रामायण काळात जेव्हा प्रभू श्रीरामाला लंकेला जायचे होते तेव्हा त्याने हात जोडून सर्व देवतांना आवाहन केले. त्यांच्यामध्ये वरून देव देखील होता. त्याला रामचंद्रांनी पार जाण्यासाठी मार्ग विचारला परंतु त्याने उत्तर दिले नाही. यावर श्रीरामाने क्रोधीत होऊन समुद्र कोरडा करण्यासाठी धनुष्य उचलले. वरून देवाने क्षमा मागितली आणि सांगितले की रामाच्या दलात जे नल आणि नील आहेत त्यांनी जर पाण्यात दगड टाकले तर ते दगड पाण्यावर तरंगतील आणि अशा प्रकारे पूल बनवता येईल. वाल्मिकी रामायणानुसार हा पूल ५ दिवसांत बनला होता आणि त्याची लांबी १०० योजने आणि रुंदी १० योजने होती. या पुलाचे नाव नल पूल ठेवण्यात आले कारण तो बनवण्यात विश्वकर्मांचा पुत्र नळ याचे विशेष योगदान राहिले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.