आधुनिक जीवनात तणाव नाही हे शक्य नाही. जीवन मिळाले आहे तेव्हाच दररोजच्या कटकटी सुद्धा मिळाल्या आहेत. गरीब, मध्यमवर्गीय, धनिक, धनकुबेर - सगळेच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चिंतेत असतात आणि तणाव त्यांचे शरीर पोखरत असतो. समस्यांवर प्रतिक्रिया केल्याने तणाव उत्पन्न होतो. तणाव हे जीवनाचे अविभाज्य अंग बनलेले आहे. परंतु मी असे मानतो की बहुतेक सर्व तणाव हा अवांछित असतो आणि तो काही सुलभ आणि काही कमी सुलभ उपाय करून कमी करता येऊ शकतो. अर्थात हे काही एका झटक्यात संभाव नाहीये - त्यासाठी मलाच अनेक वर्षे लागली आणि अजूनही मी तणाव उत्पन्न करणाऱ्या साऱ्या कारणांना दूर करू शकलेलो नाही. ध्येय कठीण आहे परंतु गाठण्यासारखे निश्चितच आहे.
एक उदाहरण पाहावे - हे थोडे वाढवून - चढवून सांगितले जात आहे परंतु त्यातून आपले तणावपूर्ण जीवन प्रतीत होते. तुम्ही सकाळी उशिरा उठता, कामावर वेळेवर जाण्यासाठी धडपडता, घाईगडबडीत न्याहारी करता, कधी तुमच्या शर्टवर चहा सांडतो, कधी दाढी करताना कापते, बाहेर पडल्यावर आठवते की आपला मोबाईल, पाकीट काही ना काही घरात विसरले आहे, आणखी देखील खूप काही. तुम्ही आत्ता गर्दीत, ट्रेफिकमध्ये अडकला आहात, तुमचा पार हळू हळू चढत जात आहे. कोणीतरी तुमच्या पुढे गाडी काढण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही उसळता, हॉर्न वाजवता, दुषणे देता, तळमळता. अध प्रकारे तुम्ही अतिशय वाईट मूड मध्ये ऑफिसला पोचता. तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र शोधता आणि तुम्हाला ते मिळत नाहीत, तुमच्या डेस्कवर सर्व वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या असतात.तुमचा इनबॉक्स सुद्धा अतिशय वाईट अवस्थेत आहे, आणि तुम्हाला २५ ई-मेल्स न उत्तर द्यायचे आहे. तुम्ही आधीच अनेक असाइन्मेंट आणि प्रोजेक्ट मध्ये उशीर केलेला आहे आणि बॉस तुमच्यावर खुश नाहीये. ११ वाजण्याच्या पूर्वी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी ३ कामे पूर्ण करायची होती आणि आत्ता १२ वाजून गेलेले आहेत. काम करता करता २ कधी वाजले ते समजलेच नाही आणि तुम्ही तुमचा लंच मिस केला.
हे केवळ एक उदाहरण म्हणून सांगितले आहे.ल मला नेमके काय म्हणायचे आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. तुमचा दिवस चांगला जात नाही. परतताना सुद्धा पुन्हा तेच ट्रेफिक. घरी पोचेपर्यंत तुम्ही अतिशय थकलेले, हलके, उशीर झालेले आणि तणावग्रस्त होऊन गेलेले असता. त्यानंतर सुद्धा तुमचे लक्ष उद्याच्या महत्त्वाच्या कामांवर असते. तुम्ही टेबलावर इनबॉक्स तुम्ही त्याच अवस्थेत सोडून आलेला आहात. घरातील अवस्था सुद्धा फार चांगली नाही. कदाचित घरातील इतर सदस्यांची सुद्धा लाईफ स्टाईल तुमच्या सारखीच झालेली असेल त्यामुळे सारखे खटके उडत राहतात. मुलं आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवत नाहीत आणि तुम्ही त्यांच्यावर ओरडत राहता. टीव्ही पाहताना तुम्ही घाईघाईत बनवलेले तळकट - तुपकट जेवण खाता आणि थकून झोपायला निघून जाता.
कदाचित तुमचे दैनंदिन जीवन एवढे कटकटीचे नसेलही परंतु यावरून तुम्हाला ती करणे लक्षात येतील ज्यांच्यामुळे लोक तणावग्रस्त होतात. करणे तर अजूनही खूप असतील पण त्यांच्यावर चर्चा खूपच मोठी होईल.
तणाव उत्पन्न करणारी करणे समजून घेऊन विचारपूर्वक दूर केली जाऊ शकतात. या आहेत त्याच्या पद्धती : -
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.