उशिरा उठणे हे अनेक समस्यांचे मूळ आहे. एखाद्या दिवशी १५ मिनिटे उशीर झाला उठायला तर रोजची सर्व कामे अटोपायला किती मगजमारी करावी लागते. कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो. लवकर उठण्याची सवय करा. त्याच्याच बरोबर लवकर झोपण्याची सुद्धा सवय करायला हवी. कामावर जाण्यासाठी लवकर निघाल्यास वर्दळ कमी असतेत आणि गाडी चालवण्याचा आनंद लुटता येतो. हे पहा की आपल्याला तयार व्हायला किती वेळ लागतो आणि एखाद्या ठिकाणी पोचायला किती वेळ लागतो. या वेळात काम करून त्रास करून घेऊ नये. एक छोटेसे वेळचे अंतर सुद्धा खूप परिवर्तन अनु शकते. केवळ १० मिनिटांचा बदल करून पहा.फरक तुमच्याच लक्षात येईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.