लोक थायलंडच्या राजधानीला इंग्रजीमध्ये बँगकॉक (Bangkok) म्हणतात, कारण तिचे सरकारी नाव एवढे मोठे आहे की त्याला विश्वातील सर्वात मोठे नाव मानले जाते, हे नाव संस्कृत शब्दांनी मिळून बनले आहे, देवनागरी लिपीमध्ये पूर्ण नाव अशा प्रकारे अहे -
“क्रुंग देव महानगर अमर रत्न कोसिन्द्र महिन्द्रायुध्या महा तिलक भव नवरत्न रजधानी पुरी रम्य उत्तम राज निवेशन महास्थान अमर विमान अवतार स्थित शक्रदत्तिय विष्णु कर्म प्रसिद्धि ”
थाई भाषेमध्ये या पूर्ण नावात एकूण १६३ अक्षरांचा उपयोग केला गेला आहे. या नावाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते बोलले जात नाही तर गायले जाते. काही लोक सोपे जावे म्हणून त्याला "महेंद्र अयोध्या" असे देखील म्हणतात. अर्थात इंद्राद्वारे निर्मित महान अयोध्या. थायलंड मध्ये जेवढे राम राजे झाले आहेत, ते सर्व याच अयोध्येत राहत आले आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.