सत्यवतीपासून राजा शांतनू याला दोन पुत्र झाले. चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगदाला राजा घोषित करण्यात आले. परंतु एका युद्धात त्याचा मृत्यू झला. अशात भीष्म विचित्रवीर्य याला गाडीवर बसवून स्वतः राज्य कारभार पाहू लागले. वंश पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी काशीराजाच्या तीन कन्यांना अपहृत करून आणले. त्यापैकी मोठी कन्या अंबा हिला ते अरात सोडून आले कारण ती शल्य राजा वर प्रेम करत होती. बाकी दोघींचा विवाह विचित्रवीर्य सोबत करून दिला परंतु त्यांना अपत्य होण्याच्या पूर्वीच विचित्रवीर्य याचा मृत्यू झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.