संमोहन विद्या ही भारतातील सर्वांत प्राचीन विद्या आहे. परंतु प्राचीन काळी तिला प्राण विद्या किंवा त्रिकाळ विद्या असे म्हणत असत. कित्येक लोकांनी तिला मोहिनी विद्या किंवा वशीकरण विद्या असेही नाव दिले. हिप्नोटीझम युनानी शब्द हिप्नोज पासून आला आहे आणि त्याचा अर्थ आहे निद्रा म्हणजेच झोप. पूर्वी साधी या विद्येचा उपयोग लोकांचे त्रास दूर करण्यासाठी करत असत. परंतु काही काळानंतर लोकांनी या विद्येचा उपयोग काळी जादू करण्यासाठी सुरु केला. भारताच्या या विद्येकडे पाश्चिमात्य संस्कृतीची नजर १८ व्या शतकात वळली. ऑस्ट्रियावासी फ्रांस मेस्मर याने सर्वांत प्रथम या विद्येचा अर्थ विज्ञानाच्या स्वरुपात स्थापित केला.१९ व्या शतकात जेम्स ब्रेड याने त्याला मेस्मेरीयन या नावाने प्रचलित केले आणि सांगितले की उपचार करण्यासाठी या विद्येचा उपयोग कशा प्रकारे केला जाऊ शकतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.