सम्मोहानाचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटे देखील आहेत. अचेतन मनाला ज्या काही सूचना सचेतन मनाकडून जातात त्यांचे पालन करावेच लागते. कदाचित त्या सूचना चुकीच्या असू शकतात, परंतु संमोहित व्यक्तीला त्यांचे पालन करावेच लागते. जर व्यक्ती कोणा अप्रशिक्षित किंवा अर्धप्रशिक्षित व्यक्तीकडून संमोहित झाली असेल तर धोका जास्त असतो. अशी व्यक्ती तुम्हाला काहीही सूचना देऊ शकते, त्यामुळे आधी माहिती करून घेणेच इष्ट.
एक मुलगी संमोहन करून घेत होती. संमोहन करणाऱ्याने तिला एक रबर दाखवला आणि सांगितले की तो एक जळता निखारा आहे आणि रबर तिच्या शरीराला लावला. ती मुलगी तीव्र भाजण्याच्या वेदनांनी किंचाळली. एवढेच नव्हे तर तिच्या शरीरावर भाजल्याची जखम देखील झाली. या गोष्टीवरून तुमच्या लक्षात येईल की संमोहन किती शक्तिशाली कला आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.