ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असेअनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना,सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितलेगेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेकमाध्यमे वैचारिक जडण-घडणामध्ये भाग घेतहोते. शाळेत शिक्षकांचे तत्त्वज्ञान व घरांत वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन ह्याचा मारासतत होत होता. घरामधली नातेमंडळी मित्र – परिवार हे त्या त्या महान तत्त्वालाअनुसरुन वागणाऱ्या आणि इतरांना वागविण्याचा प्रयत्न करताना दिसत होती. हे सारेदैनंदिन डोळ्यांदेखत होत होते, घडत होते.अनेक प्रश्न समोरयेत, परंतु ते काळाप्रमाणे, वयाप्रमाणे सोडविले जातील, याची जबरदस्त खूणगाठमनामध्ये बांधण्यात परिसर, वातावरण व संस्कार यशस्वी झाले होते.

हिरा असा सहज प्राप्त होत नसतो. प्रचंड खोदकाम, श्रमकेल्यानंतरच तो हाती लागतो. ह्या विषयीचे तत्त्वज्ञान मनाला शंभर टक्के पटले होते. श्रम आणि साध्य ह्याचे अतूट नातेमनावर चांगलेच बिंबले होते. हिऱ्याचीतुलना ईश्वरासाठी करताना, जरी ते प्राप्त होण्यासाठी श्रमाची संकल्पना पटली, तरी मनसाशंक होत राहिले. कारण श्रमानी हिरे प्राप्त केलेले अनेक दिसले, कळले होते.ईश्वरांचे मात्र तसेच असेल का? हा प्रश्न मनांत घोळत होता. कारण हिऱ्याचेअस्तित्व बघीतले होते. ईश्वराचे तसे नव्हते. तो सर्वत्र आहे, महान आहे, हे तत्वज्ञान शंभर टक्के पटले होते. परंतु तो कुणाला भेटला, दिसला ह्याचा शोध वा बोध मात्रमनाला केव्हाच मान्य झाला नाही. फक्त सांत्वनासाठी त्याचा अनुभव घ्या, तेव्हाईश्वराबद्दल कळेल हे मान्यवरांचे पांडीत्यपूर्ण तत्त्वज्ञान समजत होते, परंतु पटतनव्हते. कदाचित स्वत:मध्ये ते कळण्याची वा कळून घेण्याचीपात्रता नसेल. हे मन सांगत होते. प्रयत्न केले, प्रचंड श्रम घेतले व हीरा प्राप्तझालेला आम्ही बघीतला होता. परंतु ईश्वराचे काय? तो कुणांला आज तागायततरी दिसला, प्राप्त झाला हे ठामपणे कळले नव्हते. त्याच्या प्राप्तीची जगाच्याकोणत्याही क्षेत्रामध्ये, जागेमध्ये आणि केंव्हाही एक वाक्यता त्यावर झालेली दिसली नाही. हा एक मात्र प्रखरतेनेमान्यता पावलेले तत्वज्ञान दिसून आले की ईश्वर जरी प्रत्यक्ष दिसला भेटला नसला,तरी त्याच्यासंबधी अनुभव मात्र अनेक थोरव्यक्तीना आलेले आहे. जे त्या ईश्वराचे दिव्य भव्य असे वर्णन केले गेले तेत्यांच्या आत्मिक प्रयत्नामध्ये अनुभवांनी साध्य केले. जे अनुभव सर्व सामान्यांनासहज मिळणार नाही असे अनुभव, अनेक व्यक्तींना आल्याचे ऐकू येते. मात्र जर ते त्याईश्वरासंबंधीचे अनुभव होत असतील तर ते सर्वत्र परंतु सारखे असे असणारच नाही. तेभिन्नभिन्न असतील

२ व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात,तसेच तितकेच अनुभव होतील आणि जेथे भिन्नता तेथे अनेक मार्ग वर्णीले जातील.

कोणते तत्वज्ञान मला ह्यातून मिळाले, ईश्वर दर्शनाच्याप्रयत्नाचा शेवट, एक भव्य दिव्य अनुभवाच्या रुपांतच मिळणार. जर मी तसाच अनुभव मलाप्राप्त व्हावा ही संकल्पना केली, ध्येय आखले तर ते कदाचित पूर्ण होणार नाही. कारणशेवटी अनुभवांतील भिन्नता, माझ्या ध्येयाआड येईल, त्याच क्षणी मात्र साशंकता मनांतयेवू लागते. जर ' फक्त विश्वास ठेवा,प्रयत्न करा ' हा कुणी संदेश दिला,तर मात्र अंधश्रद्धा हीची निर्मीती होईल व ती भरकटत घेवून जाईल. काही तरी ऐकले,काहीतरी वाचले, काही तरी समजणे झाले, हेते होईल. केवळ त्या विचारातील भव्यता, दिव्यता मनाचा कोंडमारा करेल. मग ते त्याचविचारांना सत्याची झालर लावून, व्यक्त केले जात असल्याचे होईल. अनिश्चित ध्येय हेमहान तत्त्वज्ञानाची वस्त्रे धारण करेल.

मग मी काय करावे. मी एक सामान्यव्यक्ती आहे. साधा विचारक आहे. कोणाच्यातरी महान तत्वज्ञानासमोर झुकणारा. त्यांचेविचार मानणारा. कारण त्या त्या व्यक्तीने परिश्रम केलेले असतात. प्रयत्न केलेलेअसतात. जीवनातील सारे तन, मन, धन, परिश्रम त्याने खर्च केले असते. आपले सर्वआयुष्य त्या संकल्पनेच्याच ध्येयात घातले असते. हे सारे मी बघीतले असते. त्या ठराविक महानव्यक्तीविषयी मी समजलेलो असेन. मी त्याचे सारे श्रमसाध्य घेऊन, त्याच्याच विचाराने,मार्गदर्शनाने माझा मार्ग निश्चीत करु इच्छितो. मग कोठे चुकले? एखादा व्यक्ती अ,आ, ई हे शब्द घेवून अभ्यासास सुरुवात करते, प्राथमिक धड्याचा आधार घेत घेत पुढेएखाद्या प्रांतात डॉक्टरेट करते. याचाच अर्थ ती आपले सारे आयुष्य तीच्याध्येयासाठी पणाला लावते. तीला एक प्रकारची मान्यता मिळते. मला जर तेच हवे असेल, तरमाझी वाट त्याच्या प्रमाणेच प्राथमिक पासून शेवटपर्यंत तशाच प्रकारे असेल. सारआयुष्य खर्च होईल. नाही - मी त्याच्या प्राप्त शेवटच्या धाग्याला धरुन पुढे जाऊइच्छितो. त्याचप्रमाणे प्रयत्नाने त्याला दाद देत, तोच मार्ग पुढे घेवून जाण्याचेठरवितो. ह्यात माझे प्राथमिक श्रम वाचतात व वेळही. कारण आयुष्य मर्यादेचे आहे.

हा! थांबा - - थोडा विचार करा! हेच जीवनाच्या वाटचालीमधले अत्यंत महत्त्वाचे वनिर्णयपूर्व वळण असते. तेच तुम्हांला श्रमाकडे अथवा अंधश्रद्धेकडे घेवून जाणारेसिद्ध होईल. कारण यातील गोष्ट आहे की हा त्या महान व्यक्तीचा आपला अनुभव, आपलासाक्षात्कार असेल. ह्यासाठीचे हे त्याचे आपले प्रयत्न असतील व त्यासाठी त्यांनीतयार केलेली वाट, ही देखील त्याचीच असेल.त्याच वाटेवरुन जावून कुणासही खऱ्या अर्थाने काहीच साध्य होणार नाही. त्याचावैचारिक बांध, हा त्याच्या मनातून - नव्हे अंतःकरणातून निर्माण झालेला होता. मनम्हटले की भिन्नता येतेच, हाच तर निसर्गाचा चमत्कार नव्हे का?

3 ईश्वर त्याच्या अस्तित्वाची झलक नेहमीच देत आलेला आहे.मात्र पूर्वी म्हटल्याप्रमाणे दर्शनानेनव्हे तर अनुभवांनी.

एक प्रसंग आठवतो. - कोणता विचार मी करु इच्छितो. फार बैचेनमनातल्या अवस्थेमध्ये गुरफुटून जात चाललो होतो. एका निवांत जागी चिंतच करीत बसलो होतो.अचानक संगीताचे अत्यंत मधुर स्वर ऐकू आले. मनआनंदाने भरुन आले..... ज्याला अत्यानंद......म्हणतात. त्यात तल्लीन व्हावे. तंद्रीतजावे, परिसर, जग यांना विसरुन जावे. हेसारे त्या संगीताने केले होते. आनंद,समाधान ज्याला आपण म्हणतो तो सर्व प्राप्त झाला होता. काय हवयं मला आता? येथेच माझे पूर्व संस्कार, पूर्व ज्ञान झालेला वैचारिकमारा, वाचलेले ऐकलेले ईश्वरी दिव्यत्वाचे भव्यतेचे वर्णन बैचेन करु लागले. ईश्वरीदर्शन, साक्षात्कार त्यांच्यात एकरुप होणे ही ज्ञांनाची, ग्रंथांची मार्गदर्शकतत्वे चोहोबाजून मजवर आघात करु लागलो. प्रयत्न करा, श्रम करुन तुम्हाला हा हिरा प्राप्त होईल. असेच तत्त्वज्ञान.श्रम, तपश्चर्या, भक्ती, विश्वास इत्यादींच्या ... आलेल्या ईश्वराला प्राप्तकरण्याच्या मार्गाकडे घेऊन जगण्यास उत्सुक होता.

फार बैचेन झालो. नुकताच मिळालेल्या संगीताच्या आनंदाततंद्री लागलेली असताना, विचार आला की त्या संगीताला आपलस करण्यापेक्षा, त्याला माझ्यातच सामावण्यापेक्षा, मी त्या संगीतातचसामावू इच्छित होतो. ईश्वराने दिलेल्या कांनानी, श्रवणद्रींयांनी संपूर्ण आनंदलूटण्यापेक्षा, माझे चंचल मन, डोळ्याकडे अर्थात दृष्य स्वरुपाकडे झेप घेण्याचा विचारकरीत होतो. मला आता ते ध्वनी लहरी जे अत्यांनंददेत होते, ते कुणी निर्माण केले त्याचाशोध घेण्याची इच्छा होऊ लागली. कारण इतका आनंद निर्माण करणारा तो फक्त ईश्वरच असेलना, त्याला मी बघू इच्छितो. पुन्हा परत बैचेनी. कारण माझी इच्छा, आशा यांची झेपअशीच उंचावत राहणार.

जे पंचेद्रीये मला निसर्गाने दिलेलेआहेत, त्या सर्वांना त्यांच्या त्यांच्यापरी एकरुप होता येईल. व आनंदाच्या सीमामिळत राहतील, हीच सैरावैरा धावणाऱ्या मनाची विचार स्थिती. मला प्राप्तपंचेद्रीयांतील एक इंद्रीय ऐकण्याचे साधन, वाद्याचा, ध्वनीचा आस्वाद घेण्याचेइंद्रीय, शब्दांचा झंकार आत्मसात करण्याचे एक अवयव. शब्दांमध्येच उत्कठता असते. हीसमज आणि त्याच ईश्वराचे ध्वनी स्वरुप मी माझ्यांत एकरुप करत घेण्याचा प्रयत्न करीतहोतो. मी स्वत:त्या ध्वनी माध्यमांत, अक्षर स्वरुपातएकरुप होण्यास असमर्थ होतो. ती कला, ते ज्ञान मला प्राप्त नव्हते व कुणासही नसलेतरी मी त्या ध्वनी स्वरांत शिरु शकतनव्हतो. अर्थात त्या ध्वनी स्वरांचे जेस्वरुप ईश्वरी संकल्पनेचे वाटले होते, त्यात म्हणजे त्या विश्वात मिसळून जाऊ शकतनव्हतो. मात्र त्याची दुसरी बाजू ते ध्वनी मी माझ्यात माझ्या देहांत, आत्म्यांतएकरुप करणे शक्य होते. अर्थात त्यास लागतेआनंदाची तंद्री, मग्नता, लय. त्या ध्वनी लहरी ते संगीत ज्याला मी ईश्वरी स्वरुपसमजलो होतो.

4 मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ईश्वरीसंकल्पना दुरावते हे जाणले तो फक्त प्रयत्न असतो, विचार असतो, आत्मा असतो. मात्रत्या संगीतामध्ये जेव्हा एकरुप होऊन जातो,स्वत:ला विसरुन जातो,त्याचवेळी ते ईश्वरी सानिध्यात असते. त्याची उकलन करता येणार नाही, ज्याचे विश्लेषणही करता येणार नाही. ज्या विषयाचेवर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ती स्थीती ब्रह्मानंदाची Ecstasy of joy म्हणतात , ते हेनव्हे का?

माझ्या तंद्रीमधून मी बाहेर आलो, माझ्या दुसऱ्या अवयवाचाविचार करु लागलो. माझी दृष्टी माझी नजर, माझे बघणे, माझे डोळे हे सारे आतूर असतात.सतत त्या ईश्वराच्या शोध संकल्पनेला गुरफटलेले असतात. माझ्या साऱ्या प्रयत्नांचेध्येय ... फक्त एकच असते. त्या ईश्वराचे दर्शन मिळवणे. त्याला डोळे भरुन बघणे.त्याचे स्वरुप जाणणे आणि तो ईश्वर कोण, कसा हे विचाराने नजरेसमोर येवू लागते. तो ईश्वर ज्याला नावदिलेले असते. त्याला रंग रुप, आकार, वेषभूषा, पेहेराव, अयुध्ये अथवा कोणत्यातरीपवित्र वस्तू ज्या संगीतल्या गेल्या आहेत. जसे कमलपुष्प, ओमकार, स्वस्तीक, शंख,इत्यादी. अशाच त्या ईश्वराला, त्याच्या वर्णन केलेल्या दृष्यामध्ये मी माझ्याचक्षुपटलांवर आणू इच्छितो. ग्रंथकारांनी महान थोर संतांनी देखील त्याला खऱ्याअर्थाने बघीतलेले नाही. तो निर्गुण निराकार, सर्वव्यापी, सर्व साक्षी असे अंतीमवर्णन केलेले आहे. आणि हे वर्णन जगातील सर्वच धर्म ग्रंथ मान्य करतात. सगुण, रुपहे फक्त , लक्ष केंद्रीत करण्यासाठी. पंरतु आपण आपली विचारांची हद्द तेथ पर्यंतचनेवून ठेवतो. व त्याला कोणत्यातरी स्वरुपांत दृष्टीपटलावर बघायचा प्रयत्न करतो. हेदेखील त्याला ईश्वरानी दिलेल्या पंचेद्रीयातील एक इंद्रीय, ज्याच्या मार्फत हाआपला प्रयत्न असतो. ते दृष्य स्वरुप म्हणून त्याला अंतीम ध्येयामध्ये नेवून ठेवलेजाते. त्याचवेळी जीवनाचे ध्येय ईश्वराच्या स्वरुप दर्शनात जावून बसते.

त्याच्या लहरीप्रमाणेच त्याच्या दृष्यमय आविष्कारात वस्तू जाणणे आणि ती वस्तू अनुभवाने ह्या संकल्पनेत खूप फरक आहे. सुंदर गुलाबाचे फुल बघताना, उंचावरूनपडणाऱ्या धबधब्याकडे बघताना, पौर्णिमेच्या शीतल चन्द्राकडे बघताना, कोकिळेची मधुर तानऐकताना, इंद्रधानुशाचे रंगबघताना, मोराचा पिसारा फुललेला असताना नाच बघताना, एक नाही अनेक अश्या गोष्टीबघताना ऐकताना प्रत्येकजण नुसता आनंदात डुबून जात नसतो, तर तो काही क्षण स्वता:ला विसरून जातो. हीच त्याचीध्यानधारणा होय. आणि जे अशा नैसर्गिकवातावरणाशी एकरुप होतात, तोच त्याचा ईश्वरी अनुभवहोय. समोर पसरलेल्या अथांग आणि अगणित वस्तूमध्ये अगदी अनुरेणुमध्ये तो ईश्वरपसरलेला आहे. त्याला अनुभवण्यासाठी दिव्यद्र्ष्टीची गरज आहे म्हणतात, हे सत्य आहे. आमच्या द्दष्टीला वस्तू दिसते, ती त्या वस्तूचीजाण. त्यालाच जेंव्हा दिव्यद्रीष्टी अनुभवते तोच ईश्वर नव्हे काय?. म्हणूनच त्याचे स्वरूपनिराकार आहे. अपल्या द्दिष्टीक्षेपात, जाणीवेतज्या ज्या वस्तू येतात ते सारे त्याचेच अंग असते. थेट तुम्ही मी आणि सारास भोवताल.

५ हे विश्व अनंत अथांग आणि सर्वत्र. हेच तरपरमेश्वराचे स्वरूप आहे. आम्ही सदैव जे आमच्या आत बाहेर बघत असतो तोचतर ईश्वर.

ह्यालाच तर आपण ईश्वरी अनुभव म्हणतो. लोक जेव्हा मला ईश्वरी साक्षात्कार झाला म्हणतात. सदैव ज्या चित्रांचे, मूर्तीचे आकृतीचे त्यांचेचिंतन असते ते दिसण्याची मनांत प्रचंड आशा असते. त्याचप्रमाणे तशा प्रतिमा दिसूलागतात. आत्मसात होऊ लागतात. जे होते एका परिने समाधानकारक असते. मनी वसे तेस्वप्नी दिसे म्हणतात. त्याप्रमाणे विचारांच्या रम्य कल्पनेमध्ये व्यक्ती आनंदूनजाते. हे चांगले परंतू हेच तो सारे काही साध्य झाले असे धरुन जातो. येथेच अटकतो.सर्वस्व प्राप्त झाले, ह्यात समाधान मिळवतो. असेच काही ईश्वरी अनुभवाचे देखील असते.पंचेद्रीयांच्याच माध्यमातून त्याला दैवी आविष्कार झाल्याचे वाटू लागते. यात देखीलएक मात्र प्रखरतेने जाणवते. ते म्हणजेजेवढी श्रद्धा जास्त बाळगली असते. जेवढे ईश्वरी विचार गहन झालेले असतात, जेवढीवैचारीक आच ईश्वरी अनुभवाची बाळगलेली असते, तेवढेच त्याच्या देह मनाभोवती अनुभवाचे चक्र गुंफले जाते. मला वाटले, मलाअनुभवले ह्या दोन टोकांत तो फिरत राहतो. चांगल वागणं, चांगला विचार करणं, चांगलं राहणं हेच ते ईश्वरी गुणधर्म समजतो. त्यांत रममाण होतो. मात्र फक्त चांगलचं म्हणजे ईश्वर ही संकल्पना अयोग्य आहे. हा मानवी संस्कृतीचाही परिणाम आहे. सर्व काहीम्हणजेच तर ईश्वर, हे सत्य आहे. मात्र ते चांगल असो वा वाईट असो. फक्त लय, सातत्य,मग्नता आणि त्या गुणधर्मातच सर्व जगाला विसरणे, हेच तर ईश्वरी गुणधर्म ठरतात.पौराणिक कथांमध्ये अनेक दुष्ट, वाईट प्रवृत्तीच्या देखील व्यक्ती, वर्णन केलेल्याआहेत ज्यांना ईश्वरांनी दर्शन दिले, वरदान दिलेले आहेत. ते केवळ त्यांच्या तनमयहोणाऱ्या गुणधर्मामुळे. ईश्वर साध्यता ही कोणत्याही वैचारीक चौकटीत बसत नसते.अनुभव, साक्षात्कार ह्या धारणा मात्र वैचारिक जडण घडणांत बंदीस्त होतात.

आपल्याला ज्ञानाच्या साधनेसाठी, निरसर्गाने ठरावीक दालने करुन दिलेले आहेत. त्याचपद्धतीने आम्हीत्याचा आस्वाद घेऊ शकतो. सारे दिलेल्या पंचेद्रीयांच्या चौकटीनुसार असणार. ते आहेतडोळे, कान, नाक, जिव्हा व स्पर्श ज्ञान. मात्र वैचारिक ज्ञानाची झेप प्रचंड दिलेलीआहे. पाच इंद्रीयांची चौकट मर्यादीत असते. मात्र सहावे इंद्रीय ज्याला वैचरिक झेप म्हणतात, ही अमर्याद असते. पंचेद्रीयाच्यामर्यादा आखलेल्या असल्या कारणाने तुमच्या त्या त्या ज्ञानाला मर्यादा आपोआपचपडतात. हे सत्य आहे. विचार मात्र आकाश, विश्व वा सागर ईश्वरी कोठेही जाऊ शकतात.येथेच एक शंका मनांत येवू लागते. पंचेद्रीयामार्फत जे प्राप्त होते ते त्वरीत वसमोरच आपल्या देहाशी निगडीत असते. त्यामुळे विश्वास प्राप्त ठरते. दुर्दैवानेव्यक्ती यातच अडकून जाते. त्याचमुळे त्या प्राप्त साधन योजनेच्या मर्यादेमुळे जेकाही अवगत होईल ते देखील मर्यादेचे स्वरुप धारण करुनच.

६ विचारांची झेप, विश्लेषण,तर्क ह्या ज्ञानाच्या माध्यमाला मर्यादानसल्यामुळे, त्याचा आविष्कार देखील प्रचंड होऊ शकतो.

आता प्रश्न पडतो तो त्या ईश्वराच्या शोधाचा. मर्यादेचे साधन पंचेद्रीयाच्या माध्यमातून हे शक्य आहे का? सांगितल्या गेलेल्या, वर्णन केले गेलेल्या, सगुणात्मक ईश्वरी रुप हे केव्हाही प्राप्त होणारेनाही. कारण ते झाले विचारांच्या प्रचंड झेपामधून महान व्यक्तीकडून. व्यक्त झालेलेवर्णन आहे. एकाचे वर्णन त्याला दुसऱ्याच्या खऱ्या अर्थाने वा आत्मिक स्तरावरदुजारा मिळाल्याचे जाणवला नाही. कारण हे केवळ त्यांचे अनुभव वर्णन असते. मानवीइंद्रियांच्या मर्यादा जाणताना फक्त एकच बाब मनांत ठसते व पटते. ते म्हणजे ईश्वरीअनुभव येतो त्याचा खरा आनंद समाधान होणे, येथे पर्यतच. मात्र हे ही त्यांनाच जेआपल्या प्रयत्नात ते ईश्वरी अनुभव प्राप्त करण्याच्या मार्गावर जात असतात.अनेक व्यक्ती मी बघीतल्या, त्याचे जीवनचक्र बघीतले, त्या सर्व ईश्वर दर्शन वा अनुभव साक्षात्कार ह्या संकल्पनेतच गुरफटूनगेलेल्या आहे. जीवनामधला बराच काळ ते साधनेत व्यतीत करतात.

अनेकांना निराशाच हाती लागलेली जाणवते. त्याचे प्रमुख कारणही मंडळी कर्मकांडात, नामस्मरणात वा अशाच सांगितलेल्या, वाचलेल्या, ऐकलेल्यामार्गात सतत व्यस्त राहतात. आयुष्याचा फार मोठा काळ ते ह्यात खर्च करतात. हे सारेचांगले आहे. समाधान देणारे आहे. त्याच्या मनाला शांतता देणारे असेल. त्याच्याशीसहमती आहे. त्यांनी तसा प्रयत्न करावा. कुणाच्या प्रयत्नाना व योग्य संकल्पनेला मीका विरोध करावा. मला तो अधिकारही नाही व माझी क्षमताही नाही. मात्र स्वअनुभव असा की ह्या सर्व प्रयत्नात शेवटी काहीच निश्चित होत नसते. फक्त समाधानाचा ध्यासकेलेल्या प्रयत्नाला यश लाभते, ही केवळ जाणीव. काय करावे मग मी ? प्रश्न पडतो, ईश्वराचे अस्तित्व मान्य, त्याचे सर्व महानगुणधर्म मान्य केलेले आहेत. मात्र ते सर्व निर्गुण ह्या संकल्पनेत. कारण हेच तर त्याचे अद्दष्यस्वरुप असते. जेव्हा अदृष्य स्वरुप हे वर्णन मी मनातून मान्य करतो. त्याचवेळीत्याच्या कल्पीलेल्या सगुण वा दृष्य स्वरुपासाठी फार अट्टाहास करणे गैर होईल. तेफक्त आयुष्य खर्ची केल्याप्रमाणे असेल. मग ह्या संभ्रमात, द्विधा मनस्थीत मी काय करावे? ह्या चिंतनात मी पडलो.

अचानक मला तेच संगीत तेच चित्र कला, तेचनैसर्गिक दृष्य .....सारे सारे आठवू लागले. ज्या घटनांनी मला प्रचंड समाधान,अत्यानंद दिला. मनाची शांतता त्यात मला दिसली.

एक ईश्वरी अनुभव आल्याचे वाटले. येथेच मनाने एक संकल्प केला. ईश्वराचे जे काहीअस्तित्व असेल ते त्याच्याच केलेल्या सर्व जगात, विश्वात विखूरलेले असेल.प्रत्यकअणुरेणुमध्ये तो व्याप्त असेल. हे सारे पटले कारण प्रत्येक वस्तू, प्रत्येतगोष्ट, प्रत्येक

७ सभोवताल हा ईश्वरमय असेल. तर त्यालात्याच्याच कलाकृतीमध्ये शोध घेणे उचित ठरेल“कलेचा आनंद लूटाकलाराच्या शोधांत पडू नका” हा एक संदेश प्राप्त झाला. कारण ती कला देखील असामान्य आहे. मानव निर्मीतीच्या विचारांच्याहीमर्यादेबाहेरची आहे. हीच कला अर्थात हे विश्व ह्याला संपूर्णपणे जाणणे, त्याचाआस्वाद घेणे, त्या कलेत एकरुप होणे हेच तर ईश्वरी सानिध्य असेल. न दिसणाऱ्या ईश्वर प्राप्तीसाठी जीवन व्यतीत करण्यापेक्षा, ईश्वर निर्मित सजीव निर्जीव ह्या सर्वांच्या ज्ञान प्राप्तीत, संबंधात एकरुपतेत,जाणीवेमध्येच तो दडला आहे. तेच मिळवण्याचा प्रयत्न व्हावा. असे मला वाटते. कर्मकरा म्हणतात, त्यातच ईश्वर प्राप्ती आहे हे ऐकले आहे. कर्म अर्थातच चांगले मनाला आनंद देणारे, समाधान मिळणारे कर्म कऱणे म्हणजे दैनंदीन व्यहार ईश्वरी कलाकृती निर्मीतीच्या सानीध्यात जाण्याचा एक मार्ग खऱ्या अर्थाने त्या ईश्वराला समजण्याचा एक प्रकार. ईश्वरी अनुभव म्हणतात ते हेच नव्हे का?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to नाईट वॉक : लघुकथा संग्रह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
मराठेशाही का बुडाली ?
खुनाची वेळ
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी