काळी जादू तिला म्हणतात जिच्या माध्यमातून व्यक्ती आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी दुसऱ्याला नुकसान करण्याचे काम करते. बंगाल आणि आसाम यांना काळ्या जादूचा बालेकिल्ला मानले जाते. काळ्या जादूच्या माध्यमातून कोणाला जनावर बनवून कैद केले जाते किंवा कोणाला तरी वश करून त्याच्याकडून आपल्याला हवे तसे कार्य करून घेता येऊ शकते. काळ्या जादूच्या माध्यमातून कोणालाही कोणत्याही प्रकारच्या भ्रमात टाकता येऊ शकते आणि एखाद्याला मारून देखील टाकता येते.
काळी जादू शरीरात नकारात्मक उर्जा निर्माण करते. या शक्ती एखाद्या बाहेरच्या व्यक्तीकडून पाठवल्या जातात ज्या त्या व्यक्तीवर आंतरिक प्रभाव टाकतात. काळी जादू प्रत्यक्षात मनोवैज्ञानिक पद्धतीने कार्य करते. काळी जादू करणारे एखाद्याच्या अचेतन मनालाच पकडतात. तिचा प्रभाव तुमच्या मनावर होतो. बहुतेक करून तिला तांत्रिक विद्या असेही म्हणतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.