या विद्येच्या अंतर्गत स्पर्श चिकित्सा, त्रिकालदर्शिता, संमोहन, टेलीपथी, सूक्ष्म शरीरातून बाहेर काढणे, पूर्वजन्माचे ज्ञान अवगत होणे, दूरवरील ऐकणे किंवा दृश्य पाहणे अशा अनेक विद्या सामील आहेत. याशिवाय प्राण विद्येचे आजही अनेक चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात. जसे कोणी आपल्या शरीरावरून ट्रक चालवला, कोणी आपल्या बाहूंच्या बळावर विमान उडण्यापासून रोखले! कोणी पाण्याच्या खाली श्वास न घेता तासंतास राहिले, कोणी स्वतःला एक आठवडा जमिनीखाली पुरून घेतले! याच प्राण विद्येच्या बळावर कोणाला सात कुलुपांच्या आत बंद करून ठेवले तरी तो केवळ काही सेकंदांमध्ये त्यातून मुक्त होऊन बाहेर आला! याच प्राण विद्येच्या बळावर कोणी कोणाला बरे करू शकते तर कोणी कोणाला जिवंत देखील करू शकते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.