• डेनिस किंकेड या लेखकाने आपल्या हिस्ट्री ऑफ मराठा पीपलया पुस्तकात म्हटलंय - ब्रेव्हेस्ट ऑफ द ब्रेव्ह, फेअरेस्ट ऑफ फेअर, बाजीराव डाइड लाइक द मोस्ट फॅसिनेटिंग फिगर इन अ रोमान्स ऑफ लव्ह.
  • ग्रॅण्ट डफने हिस्ट्री ऑफ मराठाजमध्ये म्हटलंय - ही हॅड बोथ द हेड टू प्लॅन अ‍ॅण्ड द हॅण्ड टू एक्झेक्यूट.
  •  मिर्झा मोहम्मद नावाच्या एका इतिहासकाराने आपल्या तारीखे मुहम्मदीया ग्रंथात बाजीरावाच्या निधनाबद्दल म्हटलंय- साहिबी फुतुहाते उज्जाम. अर्थात प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव मृत्यूला बिलगला.’’


  •  'सर रिचर्ड टेंपल' यांनी वर्णन केल्याप्रमाणे बाजीरावाकडे कुशल संघटनकौशल्य होते. तो सुंदर भाषण करायचा. समरागंणावरील विजयानंतर तो आपल्या सैनिकांना उद्देशून असे काही भाषण करी की आणखी विजय मिळवण्यास त्यांचा हुरूप वाढत असे

जगभरातल्या इतक्या इतिहासकारांनी आणि बखरकारांनी ज्याला नावाजलं त्या पंडित प्रधान श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशवे यांची महती निनाद बेडेकरांनी थोडक्यात वर्णन केली. खरं तर मराठय़ांच्या इतिहासात आपल्या उंबऱ्याबाहेर जाऊन मुलुखगिरी करण्याचं स्वप्नं सर्वप्रथम बाजीरावानेच दाखवलं. आज आपण परप्रांतीयांच्या घुसखोरी विरोधात आपलाच बचाव करण्यात शक्ती खर्च करतोय. पण बाजीरावाने मराठी साम्राज्यवादाचं स्वप्न तीनशे वर्षांपूर्वी जोपासलं होतं. त्यासाठी त्याने क्षत्रियत्व स्वीकारलं आणि ते ग्रेसफुली पेललं.



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel