यापुढचा प्रत्यक्ष उपचाराचा भाग म्हणजे तज्ञ वैद्यकीय सल्ला घेणे. त्याऐवजी अनेकजण मांत्रिकाकडे जाणे, भूत उतरविणे अशा उपाययोजनांकडे वळतात. कारण मानसिक आजारावर सामान्य डॉक्टरांकडे उपाय नसतो अशी त्यांची समजूत असते. ताप आला, पोट बिघडले, अपघात झाला अशा गोष्टींसाठी औषध, इंजेक्शन, गोळ्या, ऑपरेशन हे उपाय असतात. पण एखादा माणूस सारखे डोळे मिचकावतो, तोंडातल्या तोंडात पुटपुटतो, नको तिथे नको ते करतो म्हटलं की त्याचा "स्क्रू" ढिला झाल्याचा आणि औषध, गोळ्या नव्हे तर कोणत्यातरी अदृश्य व दुष्ट शक्तीचा तो बळी असल्याचा निष्कर्ष काढला जातो. डॉक्टर मंडळी अशावेळी नेमका काय रोग झाला आहे ते सांगू शकत नाहीत पण मांत्रिक, साधू, महाराज किंवा बाबा त्या दुष्ट शक्तींकडे अचूक बोट दाखवतात. "मन आजारी पडलं" ही कल्पना फारशी रुचत नाही. पण "दुष्ट शक्तीने मनावर कब्जा केला" हे म्हणणे अगदी पटण्याजोगे असते आणि त्यावर उपाय करायला तज्ञ मांत्रिक केंव्हाही उपलब्ध असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel