दुसरे म्हणजे अंगात आल्यावर इतके बळ येते तेही मानसिकतेचा भाग आहे. परीक्षेच्या वेळी, महत्वाच्या कार्यक्रमावेळी आपण सगळी शारीरिक शक्ती एकवटतो तसाच हा प्रकार असतो हे लक्षात घेतले पाहिजे ही भ्रम झालेली व्यक्ती एका बेभान अवस्थेत झाडावर उंच चढते हे खरे. पण ज्याला प्रशिक्षणाची गरज नाही अशाच गोष्टीच ती व्यक्ती करू शकते. त्यामुळेच अंगात आल्यावर गुळगुळीत खांबावर चढणे, झाडावर चढणे अशी कृत्ये तिला करता येतात. पण पोहणे, सायकल चालवणे याचे जर तिने प्रशिक्षण घेतले नसेल तर अंगात देवीचे कितीही बळ संचारले तरी ती बाई पाण्यात पोहू शकणार नाही, किंवा सायकल चालवू शकणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.