अशा मानसिक विकारावरील उपचार हेही मानसिकच असावे लागतात. रुग्णाला आपुलकी, जवळीक, मानसिक आधार याची मुख्य गरज असते. डॉक्टरकडे केल्या जाणाऱ्या उपायांना मर्यादा असतात. उदाहरणार्थ डॉक्टरी उपचारांनी गोवर सात दिवसात बरा होतो व कोणताही उपाय न करता तो आठवडयात बरा होतो असे म्हणतात. याचा अर्थ इतकाच की गोवर हा हवेतील विषाणूंच्या संसर्गाने होणारा रोग आहे आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जागी झाल्यावरच तो बरा होतो. सातव्या दिवशी जे औषध किंवा जो डॉक्टर त्यावर उपचार करतो त्याला त्याचे श्रेय मिळणार! असंख्य डॉक्टरांकडे उपचार करून कंटाळलेला एखादा रोगी कुणा महाराजाच्या अंगाऱ्यामुळे बरा झाल्याच्या कथा याच प्रकारात मोडत असतात.
एकदा ही रोगमीमांसा झाली की अनेक गूढ बाबींचा उलगडा होऊ लागतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.