जनीं ते अंजनी माता । जन्मली ईश्वरी तनू । तनू मनू तो पवनू । एकची पाहतां दिसे ॥१॥
त्रैलोक्यीं पाहताम बाळें । ऐसें तों पाहतां नसे । अतुल तुलना नाहीं । मारुती वातनंदन ॥२॥
चळे ते चंचळ नेटे । बाळ मोवाळ साजिरें । चळताहे चळी चळवळी । बाळ लोवाळ गोजिरें ॥३॥
हात कीं पाय कीं सांगो । नखें बोटें परोपरी । दृष्टीचें देखखें मोठें । लांगूळ लळलळीतसे ॥४॥
खडीखाडी ददे तैसा । पीळ पेच परोपरी । उड्डाण पाहतां मोठें । झेंपावे रविमंडळा ॥५॥
बाळानें गिळिला बाळू । स्वभावें खेळता पहा । आरक्त पीत वाटोळे । देखिले धरणीवरी ॥६॥
पूर्वेसि देखतां तेथें । उडालें पावलें बळें । पाहिलें देखिलें हातीं गिळिलें जाळिलें बहू ॥७॥
थुंकोनि टाकितां तेथें । युद्ध जालें परोपरी । उपरी ताडिला तेणें । एक नामचि पावला ॥८॥
हा गिरी तो गिरी पाहे । गुप्त राहे तरूवरी । मागुता प्रगटे धांवें । झेंपावें गगनोपरी ॥९॥
पळही राहिना कोठें । बळोंचि घालितां झडा । कडाडां मोडती झाडें । वाडवाडें उलंडती ॥१०॥
पवनासारिखा धांवे । वावरे विवरे बहू । अपूर्व बाळलीला हे । रामदास्य करी पुढें ॥११॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भीमरूपी स्तोत्रे


श्यामची आई
मनाचे श्लोक
स्तोत्रे १
श्री शिवलीलामृत
व.पु.काळे संकलन
चाणक्यनीति
नाईट वॉक : लघुकथा संग्रह