भुवनदहनकाळीं काळ विक्राल जैसा । सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।
दुपट कपिंत झोके झोंकिली मेदिनी हे । तळवट धरि धाकें धोकिली जाउं पाहे ॥१॥
गिरिवरुनि उडाला तो गिरि गुप्त झाला । घसरत दश गांवें भूमिकेमाजिं गेला ।
उडती झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें । पडति कडकडाटे अंगवातें धुधाटें ॥२॥
थरथरित थरारी वज्र लांगल जेव्हां । गरगरित गरारी सप्त पाताळ तेव्हां ।
फणिवर कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली । तगटित पवनाची झेंप लंकेसि गेली ॥३॥
थरकत धरणी हे हाणतां वज्रपुच्छें । रगडित रणरंगीं राक्षसें तृण तुच्छें ।
सहज रिपुदळाचा थोर संहार केला । अवघड गडलंका शीघ्र जाळून आला ॥४॥
सहज करतळें जो मेरुमंदार पाडी । दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।
अगणित गणवेना शक्ति काळासि हारी । पवनतनुज पाहा पूर्ण रुद्रावतारी ॥५॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भीमरूपी स्तोत्रे


श्यामची आई
मनाचे श्लोक
स्तोत्रे १
श्री शिवलीलामृत
व.पु.काळे संकलन
चाणक्यनीति
नाईट वॉक : लघुकथा संग्रह