नमन गा तुज हे भिमराया । निज मती मज दे मज गाया । तडकिता तडकी तडकाया । भडकितां भडकी भडकाया ॥१॥
हरुषला हर हा वरदानीं । प्रगटला नटला मन मानी । वदविता वदनीं वदवितो । पुरवितो सदनीं पदवी तो ॥२॥
अवचितां चढला गडलंका । पळभरी न धरी मनिं शंका । तडकितां तडकी तडकांतो । भडकितां भडकी भडकीतो ॥१॥
खवळले रजनीचरभारें । भडकितां तडके भडमारें । अवचितां गरजे भुभुकारें । रगडिजे मग काम दळ सारें ॥४॥
कितियका खरडी खुरडीतो । कितियका नरडी मुरडीतो कितियका चिरडी चिरडीतो । कितियका अरडीं दरडीतो ॥५॥
बळि महा रजनीवर आले । भिम भयानकसेचि मिळाले । रपटितां रपटी रपटेना । अपटितां अपटी अपटेना ॥६॥
खिजवितां खिजवां खिजवेना । झिजवितां झिजवी झिजवेना । रिझवितां रिझवी रिझवेना । विझवितां विझवी विझवेना ॥७॥
झिडकितां झिडकी झिडकेना । तडकितां तडकी तडकेना । फडकितां फडकी फडकेना । कडकितां कडकी कडकेना ॥८॥
दपटितां दपटीं दपटेना । झपटितां झपटी झपटेना । लपटितां लपटी लपटेना । चपटितां चपटी चपटेना ॥९॥
दवडितां दवढी दवडेना । घडवितां घडवी घडवेना । बडवितां बडवी बडवेना । रडवितां रडवी रडवेना ॥१०॥
कळवितां कळवी कळवेना । खवळितां खवळी खवळेना । जवळितां जवळी जवळेना । मळवितां मळवी मळवेना ॥११॥
चढवितां चढवी चढवेना । झडवितां झडवी झडवेना । तडवितां तडवी तडवेना । गडवितां गडवी गडवेना ॥१२॥
तगटितां तगटी तगटेना । झगटितां झगटी झगटेना । लगटितां लगटी लगटेना । झकटितां झकटी झकटेना ॥१३॥
टणकितां टणकी टणकेना । ठणकितां ठणकी ठणकेना । दणगितां दगणी दणगेना । फुणगी फुणगेना ॥१४॥
चळवितां चळवी चळवेना । छळवितां छळवी छळवेना । जळवितां जळवी जळवेना । टळवितां टळवी टळवेना ॥१५॥
घसरितां घसरी घसरेना । विसरितां विसरी विसरेना । मरवितां मरवी मरवेना । हरवितां हर्वी हरवेना ॥१६॥
उलथितां उलथी उलथेना । कलथिना कलथी कलथेना । उडवितां उडवी उडवेना । बुडवितां बुडवी बुडवेना ॥१७॥
बुकलितां बुकली बुकलेना । धुमसितां धुमसी धुमसेना । धरवितां धरवी धरवेना । सरवितां सरवी सरवेना ॥१८॥
झडपितां झडपी झडपेना । दडपितां दडपी दडपेना । तटवितां तटवी तटवेना । फटवितां फटवी फटवेना ॥१९॥
वळवितां वळवी वळवेना । पळवितां पळवी पळवेना । ढळवितां ढळवा ढळवेना । लळवितां लळवी लळवेना ॥२०॥
घुरकितां घुरकी घुरकावी । थरकितां थरकी थरकावी । भरकितां भरकी भरकावी । झरकितां झरकी झरकावी ॥२१॥
परम दास हटी हटवादी । लगटला उतटी तटवादी । शिकवितां शिकवी शिक लावी । दपटितां दपटून दटावी ॥२२॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भीमरूपी स्तोत्रे


श्यामची आई
मनाचे श्लोक
स्तोत्रे १
श्री शिवलीलामृत
व.पु.काळे संकलन
चाणक्यनीति
नाईट वॉक : लघुकथा संग्रह