भिम भयानक तो शिक लावी । भडकला सकळां भडकावी । वरतरू वरता तडकावी । बळकटां सकळां धडकावी ॥१॥
सकळ ते रजनीचरभारे । संकटें बांधत पुच्छ उभारे । रडत बोलती वीरच सारे । न दिसतांचि बळें भुभुकारे ॥२॥
जळतसे त्रिकूटाचळ लंका । धरितसे रजनीचर शंका । उमजती उमजे वर घाला । अवचितां बुडवी सकळांला ॥३॥
कठिण मार विरांस न साहे । रुधिरपूर महीवरि वाहे । बहुत भूत भुतावळि आली । रणभुमीवरि येउनि धाली ॥४॥
अमर ते म्हणती विर आला । नवल हें पुरलें सकळांला । उदित काळ बरा दिसताहे । विधिविधान विधी मग पाहे ॥५॥

॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भीमरूपी स्तोत्रे


श्यामची आई
मनाचे श्लोक
स्तोत्रे १
श्री शिवलीलामृत
व.पु.काळे संकलन
चाणक्यनीति
नाईट वॉक : लघुकथा संग्रह