याकारणें ईश्वरें पाहे । पार्वतीस बोध केला आहे । पारंपार मार्ग चालिला आहे गुरुसेवा सुदुर्लभ ॥१४॥
विधाता आदि करूनि समस्त वंदिती याचिगुणीं । जो जाहला अंतर - मनोन्मनी । तोचि श्रेष्ठ सकळिकां ॥१५॥
गुरुसेवा अनंत सुख । दूर होय समस्त दुःख । तोचि धन्य नर एक । या क्षितीवरी ॥१६॥
वशिष्ठ वाल्मीक जनकादिक । समस्त नाव पावले गुरुसेवें निक । तुम्ही शहाणे चतुर विवेक । भजा भजा ही श्रीगुरूसी ॥१७॥
सद्गुरूसी भजतां सद्भावेंसी । सद्गति होईल तुम्हां भरंवसीं । याकरणे स्थिरमनेसीं । शरण रिघावें श्रीगुरुमूर्तीस ॥१८॥
गुरुमूर्तीसि संतोष होतां । त्रयमूर्ति तुष्टती तत्त्वता । वेदशास्त्रीं असे संमता । पारंपर गुरुमार्ग हा ॥१९॥
पूर्वी युगायुगीं पाहें । आयुष्य फार नरदेहा । अनेक तप करिती सायास पाहे । मुक्ति होत त्या नरांसी ॥२०॥
आतां वर्तला कली प्रबळ । वेदमार्ग राहिला सकळ । जन जाहले मूढ केवळ । ज्ञानहीन पशूपरी ॥२१॥
या कलियुगामाझारीं । ज्ञानी जाहले मूढापई । कांही नेणती अंधबधिरीं । मायापाशे वेष्टोनियां ॥२२॥
याकारणें तुम्हीं विद्वज्जन । ‘ गुरुभाव ’ धरा स्थिरमनें । तुमचें तुटेल भवबंधन । श्रीगुरुराजप्रसादें ॥२३॥
लाधे ज्यासी गुरुप्रसाद । त्यासी प्रपत होय कैवल्यपद । दूरी होईल कामक्रोधमद । साध्य होईल पद - अच्युत ॥२४॥
अवतार याकारणें । घेतला असे नारायणें । साधुजन उद्धरावयाकारणें । अवतरले कैयुगीं श्रीगुरुमूर्ति ॥२५॥
भूमिभार उतरावया । जन्म धरिला श्रीपादराया । दत्तात्रेय - आवधूतरायें । वेष धरिला नर देहीं ॥२६॥
देह धरूनि श्रीगुरुमूर्ति समस्त उद्धरिले जडमति । अवतरले आणि लक्ष्मीपति । केवळ सात्त्विक रूपानें ॥२७॥
जे जे असती भाविक जन । त्यांसी उद्धरी आपण । बळात्कारें जाई त्यांचिया भुवना । श्रीसद्गुरुराजयोगी ॥२८॥
आतां असो हें युक्तीचें कथन । भावें धरा हो सद्गुरुभजन । हातां चढेल उमारमण । श्रीगुरुप्रसादें ॥२९॥
श्रीगुरुप्रसाद लाधे ज्यासी । त्यासी साध्य व्योमकेशी । निवारण करी मोहपाशासी । मग रहाल शाश्वत पदीं ॥३०॥
संसार म्हणिजे भवसमुद्र । यासी करावा निःशेष भद्र । बळकट धरावी भाव मुद्रा । मग पावाल पैलपार ॥३१॥
गुरुभक्ति म्हणिजे कामधेनु । कल्पिलें होय मनकामनु । न धरावा मनीं तुम्ही अनुमानु । शरण रिघावें श्रीगुरुमूर्तीसी ॥३२॥
प्रसन्न होतां श्रीगुरु जाण । बाधों न शके यम आपण । जरी असेल पापक्षोण । लय होईल भरंवसें ॥३३॥
संपर्क होतां अग्नीसी । तृणबणवी होय भस्मसुरसी । तैशा तुमच्या सकळ पापराशी । निःशेष जातील परियेसा ॥३४॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सरस्वतीगंगाधरविरचिते गुरुगीतावर्णनं नाम एकोनपंचाशत्तमोऽध्यायः ॥४९॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to दत्त स्तोत्रे


विठ्ठल
महर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे
नवसाला पावणारे गणपती- भाग १
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
गणपती
हर हर महादेव- भाग १
नवसाला पावणारे गणपती- भाग ५
नवसाला पावणारे गणपती- भाग ३
नवसाला पावणारे गणपती- भाग ४
नवसाला पावणारे गणपती- भाग २
नामस्मरण
श्रावण
तुकाराम गाथा
गणेश चतुर्थी व्रत
संत वंकाचे अभंग