सूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे. सूर्याचे दुसरे ना आहे "सविता" अर्थात सृष्टी निर्माण करणारा. ऋग्वेदानुसार ’ सविता सर्वस्य प्रसविता’ ( निरुक्त १०-३१ ) आकाश मंडळात सूर्य ग्रह सर्वांच प्रेरक अंतर्यामी तसेच परमात्मास्वरूप आहे.

मार्कंडेय पुराणानुसार सुर्य ब्रह्मस्वरूप आहे. सुर्यापासून जगाची उत्पत्ती होते. सूर्य सर्वभूतस्वरूप अनातन परमात्मा आहे. ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांच्या रूपात सूर्य देवता जगाचा सृजन, पालन, संहार करतात.

भगवान सूर्याचे वर्णन-

* सुर्याचा रंग लाल आहे.

* सूर्याला दोन भुजा आहेत.

* सूर्य कमळात बसले आहेत.

* सुर्याच्या दोन्ही हातात कमळे आहेत.

* त्याच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट आणि गळ्यात रत्नांची माळा आहे.

* ते रथात बसलेले असून, रथाला सात घोडे आहेत. सारथी अरुणी आहे.

रथाला एकच चाक असून, ते संवत्सराचे प्रतिक आहे, तर चाकाला बारा अरे आहेत बारा राशींचे प्रतीक.

सूर्याची प्रमुख अस्त्रे - चक्र, शक्ति, पाश आणि अंकुश.

सुर्याचे दुसरे नाव "आदित्य" त्याची कथा-

एकदा राक्षसांनी एकत्र येउन देवांवर हल्ला करून त्यांना पराजित केले अणि देवलोक व त्यांचे अधिकार घेतले. देवमाता अदिती त्याच्यापासून मुक्ति मिळविण्यासाठी सुर्यदेवांची उपासना करू लागली. तेव्हा सूर्यदेवांनी अदितीच्या गर्भातून अवतार घेतला आणि राक्षसांचा पराभव करून सनातन वेदमार्गाची स्थापना केली. म्हणून सुर्याला ’आदित्य’ म्हणतात.

सूर्य उपासनेचे सामान्य मंत्र

वैदिक मंत्र-

'ॐ आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यं च।

हिरण्येन सविता रथेना देवो याति भुवनानि पश्यन्‌॥

पौराणिक मंत्र-

'जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिम्‌।I

तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम्‌॥

बीज मंत्र-

ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः।

सामान्य मंत्र

ॐ घृणि सूर्याय नमः।

Sun is leader of the nine planets

According to Vedic literature,the main deity is the Sun-god. The sun is personified as seated on a pink lotus in lotus posture. While driving a chariot led by seven white horses, he is holding lotus flowers in his hands giving blessings.Sun is the God - a living God - whom everyone can see, perceive and pray. Though he is visible, he also has been presented in a variety of forms. Sun is the life-giver and time-giver. The Vedas adore him as a witness (Sakshi) of all actions. He is the lord of Leo in the Zodiac. He stays one month in each Rasi and takes 365 days or 12 months to complete a round of 12 Rasis. Worship of this Devata (GOD) on Sunday is supposed to bring in manifold benefits to the worshippers.

The Sun is known as the Atmakaraka. This comes from the Sanskrit atma meaning soul, and karaka meaning indicator. As "indicator of the soul" the Sun is the giver of life. The Sun is the indicator of the father, our ego, honour, status, fame, the heart, the eyes, general vitality, respect and power.

There are thousand names of Sun, but prior name is 'Aditi".

In Mahabhaarata the strongest personality was "Suryaputra Karna".

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel