॥ श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरवे नम: । श्रीदत्तात्रयाय नम: । श्रीवेताळायनम: ॥ श्रीएकादशरुद्राय नम: ॥
आतां नमूं गणेशा । जो कां सर्व विद्यांचा ठसा । जयापासूनि उत्पत्ति देखा । सकळ शास्त्रांची ॥ १ ॥
तो गणराज नमीजे । त्यातें प्रकाश मागीजे । देवा तूं कृपा कीजे । मज बाळकावरी ॥ २ ॥
जयजयाजी गणराजा । सरळशुंडा चतुर्भुजा । देवी गौरीचिया सुता । नमन माझें ॥ ३ ॥
आतां वंदूं ते भवानी । जे कां अगोचर त्रिभुवनीं । ते मीं वंदिली भवानी । आदिशक्तिमाया ॥ ४ ॥
तिचे प्रसादेंकरून । मज जाहलें मतिप्रकाश गहन । आतां करीन स्तवन । श्रीवेताळाचें ॥ ५ ॥
जयजयाजी वेताळा । अष्टकोटी भूतांचिया भूपाळा । कृपा करावी स्नेहाळा । दयाळा मज रंकावरी ॥ ६ ॥
तूं जरी कृपा करसी । भक्तांचे ह्रदयीं प्रकाशसी । अनेक जातींच्या पुष्पांसी । परिमळ तूं देवा ॥ ७ ॥
देवा तुझे नमिले चरण । पवित्र जाहलें अंत:करण । परि त्वां व्हावें प्रसन्न । मज दीनासी ॥ ८ ॥
अगा देवा तुझे स्वरूपाची वर्णनकथा । पृथक् पृथक् करीन भूतगणनाथा । परि तूं क्रोधायमान सर्वथा । नसावें स्वामिया ॥ ९ ॥
यदर्थी तुझें गुणस्तवन । करावया कैचें मज ज्ञान । मी तव मूढ मती दीन । तुझें स्तवन काय जाणें ॥ १० ॥
म्हणोनि तुझें करितों स्तवन । तुवां व्हावें प्रसन्न । करावया जाण । कवित्व देवा ॥ ११ ॥
देवा जरि तूं प्रसन्न होसी । तरी पार नाहीं कवित्वासी । अमावस्येच्या दिवशीं । उचंबळ होय समुद्रासी ॥ १२ ॥
ऎकतांच तुझें महिमान । मज जाहलें मतिप्रकाश गहन । मग केलें वर्णन । तुझे स्वरुपाचे ॥ १३ ॥
एथून तव रूपाचें वर्णन । पृथक् पृथक् करीन जाण । माझें पंचमेळ प्रमाण । पुष्पा तुळें तुझे चरणीं ॥ १४ ॥
काय वर्णूं तुझे स्वरूप । सुंदर सरळ अंगोलिया देख । नखप्रभा अति सुरेख । रातोत्पळाचिया परी ॥ १५ ॥
चरणीं ब्रिदाचा तोडर । पोटरिया अति सुंदर । गुडघे मांड्या सुकुमार । शोभायमान असती ॥ १६ ॥
जानु कटी अति विशाळ । खालतें विश्व उत्पत्ति स्थळ । वरी पीतांबराचा झळाळ । अति रम्य साजिरा ॥ १७ ॥
कटीवरतें नाभीकमळ । ह्रदय जैसें गंगाजळ । कंठीं पदक मोहन माळ । अति रम्य साजिरी ॥ १८ ॥
कंठावरुतें मुखकमळ । हनुवटी अत्यंत निर्मळ । दोन्ही अधर पुढें कोमल । सुंदर प्रवाळाचिये परी ॥ १९ ॥
अधरामाजीं दंतहार तांबूल शोभे कुंकुमाकार । नेत्र जैसें अग्निचें घर । नासिकीं पवन स्थिरावला ॥ २० ॥
श्रवणीं कुंडलें सोज्वळ । नाभी चंदन परिमळ । मस्तकीं शोभे मंदिल । अति साजिरा ॥ २१ ॥
रत्नखचित शिबिका । त्यामाजीं बैससी भूतनायका । मागें पुढें कटका । दाटणी होय ॥ २२ ॥
निळ्या पताका मनोहर । गजरें चाले दळभार । मागें चालती स्वार । कोण कोणते अवधारा ॥ २३ ॥
मल्हारी अश्वावरी । भैरव तयाचिये परी । भवानी व्याघ्रावरी । चालती अति सत्वरें ॥ २४ ॥
ऎसा तूं देवाधिदेव । तुझ्या स्वारीचा मध्यरात्रीं समय । तेणें महिमंडळ । डळमळूं पाहे ॥ २५ ॥
दक्षण महिकेताळ प्रधान । वामांगीं चितळाचें वाहन । मध्यें शिबिका शोभायमान । तारांगणीं चंद्रमा जैसा ॥ २६ ॥
ऎशी महिमा अपार । मज न वर्णवे साचार । तरी कांहीं ज्ञानपदर । मज दीनातें देईजे ॥ २७ ॥
आतां पृथक पृथक् करीन स्तुती । भक्तीं ऎकावी एक चित्तीं । प्रपंचीं न घालोनि मती । यथायुक्ती परिसिजे ॥ २८ ॥
जय जयाजी वेताळा । जयजयाजी महाकाळा । जयजयाजी भूपाळा । उग्र रूपा स्वामिया ॥ २९ ॥
जयजयाजी भूतनाथा । जयजयाजी कृपावंता । जयजयाजी अनाथनाथा । भक्तकृपाळा गुणसागरा ॥ ३० ॥
जयजयाजी विशाळनयना । जयजयाजी कृपाघना । जयजयाजी अरिमर्दना । भक्तरक्षका स्वामियां ॥ ३१ ॥
जयजयाजी भूपसुंदरा । जयजयाजी मनोहरा । जयजयाजी गुणसागरा । भक्त चकोरां पावावें ॥ ३२ ॥
ऎशा करुणा वचनीं भैरवदास । प्रार्थितां पावला मज दीनास । ओतिला चैतन्यकृपेचा सौरस । सुखसंतोष पैं जाहला ॥ ३३ ॥
करोनि दुसरेपणें बोलणें । श्रोतीं असावें सावध मनें । ग्रंथाक्षरीं यथार्थ वचनें । दासाचीं परिसावी ॥ ३४ ॥
कोणासी पडलिया संकष्ट । अथवा आलिया दुष्ट अरिष्ट । तेणें तीन सप्तकें ग्रंथ पाठ । आदरें करोनि वाचावा ॥ ३५ ॥
पुत्रार्थी अथवा धनार्थी । तेणें तीन मास कराव्या तीन आवृत्ती । त्यासी कृपा करील भूपती । जाणा निर्धारी ॥ ३६ ॥
अत्यंत रोगी असेल नर । व्यथेनें पीडिला असेल फार । त्याणें सात शनिवार निरंतर । ग्रंथ आदरें वाचावा ॥ ३७ ॥
भूतपिशाश्च समंध बाधा । प्राणियासी जाहलिया आपदा । पंचसप्तकें ग्रंथ सदां । श्रवण करावा तयानें ॥ ३८ ॥
तयासी दया करील आपण । यदर्थी वहातसें आण । कारागृहींचें बंधमोचन । द्वयसप्तेकें सुटेल ॥ ३९ ॥
जी जी इच्छा करील प्राणी । ती ती पुरवील गदापाणी । यालागीं सर्वजनीं । आळस सर्वथा न करावा ॥ ४० ॥
एकचित्तें एकभावें करोनी । जो चिंतील वेताळ अंत:करणीं । त्यासी संकटीं निर्वाणीं । गदापाणी तारील हा निर्धार ॥ ४१ ॥
जो उठोनि प्रात:काळीं । नित्य स्मरेल ह्रदयकमळीं । त्याची इच्छा असेल ती सकळी । पूर्ण करील श्री वेताळ ॥ ४२ ॥
कोणासी पडलिया महासंकट । त्यानें नित्य स्मरावें श्री वेताळास । त्याचीं संकटें अरिष्टें निभ्रांत । श्री वेताळ दूर करील ॥ ४३ ॥
ज्यासी असेल भूतप्रेत पिशाचबाधा । प्राणियासी जाहलिया आपदा । त्यानें पंचसप्तकें ग्रंथसदां । आदरें करूनी वाचावा ॥ ४४ ॥
त्यासी वेताळ प्रसन्न होऊन । त्याची रोग पीडा सर्व दूर करून । त्याचीं सर्व विघ्नें निरसून । त्यास निर्वाणीं तारील ॥ ४५ ॥
युद्धाचे समय़ीं निश्चित । जो चिंतील रात्रंदिवस । त्यासी प्रसन्न होऊन युद्धास । यशप्राप्ती पावेल ॥ ४६ ॥
सुंदरी विनवी पूढती । ग्रंथ केवळ भागीरथी । श्रवणमात्रें उत्तम गतीं । प्राणीमात्रासी होय पैं ॥ ४७ ॥
हें सत्य न मानी ज्यांचे चित्त । त्यासी पीडा करील श्री भूतनाथ । यथार्थ मानोनियां सत्य । ग्रंथ आदरें वाचावा ॥ ४८ ॥
एकभावें एक मनें करुनि । जो श्रवण करील रात्रंदिनीं । त्यासी वेताळ प्रसन्न होऊनी । इच्छा त्याची पूर्ण करील ॥ ४९ ॥
तव हात जोडोनि बोले सुंदरी । आपुली पूजा कोणे प्रकारी । केसी असतां भेटी निर्धारी । होईल तुमची सांगा मज ॥ ५० ॥
तव बोले वेताळ ऎक सुंदरी । पूजा सांगतों बरव्यापरी । चित्त देईं भावें करूनी । सांगतों तें अवधारीं ॥ ५१ ॥
अबीर गुलाल सेंदूर । केळीं पोफळें नारिकेल । बदाम आक्रोड खर्जूर । सुवासिक उदबत्त्या असाव्या ॥ ५२ ॥
ऊद असावे बहुप्रकारक । पुष्पहार सुवासिक । सिद्धसामग्री करूनि आणिक । जावें समुद्रा लागोनि ॥ ५३ ॥
करोनि सचैल स्नान । ध्यावें सामग्रीशीं जाण । सांगितल्यापरी चौक भरून । बावन्नबीरांचें ध्यान कीजे ॥ ५४ ॥
चारी दिशा भाराव्या पूर्ण । आसनीं बैसावें धीट होऊन । प्रारंभ झालियापासून । कोण कोण येती ते ऎकपां ॥ ५५ ॥
मल्हारी देव अश्वावरी । भैरव तयाचिये परी । भवानी व्याघ्रावरी । धांवर येती अतिगजरें ॥ ५६ ॥
आणिक येती विक्राळ आसनीं । त्यासी भातुकें टाकोनि । ते अवघे गेलियावरी । सावधान बैसावें ॥ ५७ ॥
जेव्हा येईल वेताळाची स्वारी । वाजत गाजत हर्षभरी । जाऊनीयां तयाजवळी । धरावे चरण तयाचे ॥ ५८ ॥
ऎसी भेटी झालियावरी । प्रसन्न होईल ते अवसरीं । ऎसें कार्य झालियावरी । आसन काढावें तेथून ॥ ५९ ॥
ऎक सुंदरी ममवाणी । हें स्तोत्र जे जपती प्राणी । त्यासी मी रक्षीन रात्रंदिनिं । सत्य सत्य जाणपैं ॥ छ०॥
इति श्री वेताळ स्तोत्र समाप्त श्री वेताळार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.