एक नवल देखिलें । एका चोरानें गांव चोरिलें । त्याचे मागें धांवणें निघालें । चोर आणि गांव नाहींसे झालें ॥ १ ॥

मुळींच गांवा नव्हता पाया । वरला गांवकुस गेला वायां । खादून गेला मुळींचा पाया । उडाले देउळ देव गेला वांया ॥ २ ॥

कळस उडाला स्वर्गावरी । पाया गेला पाताळविवरीं । भिंत हिंडे दारोदारीं । ऐशी जहाली नवलपरी ॥ ३ ॥

देऊळ पाया आणि भिंती । अर्थ पहा उगवोनि गुंती । एका जनार्दनीं विश्रांती । देव देऊळ अवघा गुरुमूर्ती ॥ ४ ॥

N/A
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel