नवलाचें नवल आज म्यां देखिलें । सागराचें पाणी रांजणासी आलें ॥ १ ॥

नवल गे माये नवल गे माये । गंगा येउनी रांजणांत सामाये ॥ २ ॥

निर्मळ पाणी डहुळतें जहाले । डहुळलें पाणी रांजणांत आलें ॥ ३ ॥

मृगजळाचें नीर रांजणीं भरलें । एका जनार्दनीं नवलचि केलें ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel