याची सत्ता स्वामीवरी । ऐसे ते बळी पाईक ॥ १ ॥
उदार धीर एक मनें । स्वामीकार्या देह देणें ॥ २ ॥
न धरिती कांहीं आशा । म्हणोनि सर्वेशा पात्र होती ॥ ३ ॥
एका जनार्दनीं पाईक । मुकुटमणी स्वामिया एक ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.