घ्या जोहार घ्या जोहार । मी निराकारीचा महार । संत सभेचा कारभार । मीच करितों की जी मायबाप ॥ १ ॥

मी धन्याचा आवडतां फार । धन्याचा विश्वास मजवर । धन्याचे चाकरीअर रुजू मी की० ॥ २ ॥

चार वेदां झाडितों । सहा शास्त्रांचा केर भरितों । पुराणें सर्व जमा करितों । संत सभेची सांपडेल वाट ।

तेणें मार्ग नीट सांपडेल की० ॥ ४ ॥

मार्ग धरा पंढरीचा । एका विनवी जनार्दनाचा । रामनाम बोला वाचा । सावध होऊन की जी मायबाप ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel