जोहार मायबाप जोहार । मी विठु पाटलाचा महार । हिशोब देतों ताबेदार । लंकेचा कारभार की जी मायबाप ॥ १ ॥

आवाजीकडून येतों । अर्धी भाकर मागून खातों । सारी रात्र गोवरापाशीं जागतों । फरमासी करतों की जी मायबाप ॥ २ ॥

पाटलाचा नांगर शेट्याची तागडी । आईबाईची बांगडी । आंत माझी पांचांची घडामोडी । करितों की जी मायबाप ॥ ३ ॥

येथें कुळकर्णी स्वाधीना करा । गांवचा हिशोब पाहिजे बरा । धन्याची रजा तलबेप्रमाणें मुशारा । ये चित्तांत की जी मायबाप ॥ ४ ॥

ब्रह्मानंदीं केला जोहार । एका जनार्दन बाजीचे उत्तर । माप केलें खरोखर । काय बोलिजे की जी मायबाप ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel