कनगुळी भानगुळी सूप टोपली । आदिमाया नमो भगवती मानवी हो काय करून ठेविलीये । निवांत देखिलीये ॥ १ ॥

मरीआईचा कोरडा वाजतो । सिंहेवरी कोरडा वाजतो । गाड्यावरी कोरडा वाजतो ॥ध्रु०॥

चारी पुरुषार्थ प्रसंगीं घालुनी । निरंजनीं पुंडलिकाचे द्वारीं बैसोनी । भक्ति पुरस्करोनी । निवांत देखिलीये ॥ २ ॥

मच्छे कच्छे वराहे नारसिंहे । वामने परशरामे कृष्णे बौद्धे । कलंकीये सीते जान्हवीये ॥ ३ ॥

वैष्णव कुळाचा उद्धार करोनी । चौवर्णाचे मळवट भरोनी । अठराजणांची रांडोळी करूनी । गाढे दृढ दैत्यांची आहुती घेउनी । बळी बगाडें तुजला देउनी ॥ ४ ॥

अनुहत ब्रह्मांडें तुझा देव्हारा । म्हणून तुला अर्पिला माय तरुवरा । लिंबें घेउनी नारळें मारा ॥ ५ ॥

ऐसी पूजियेली नरतनु । भक्तासी करिसी विनवणु । तैसें नव्हे रे ज्ञान अझुनू । प्रसन्न होउनी ये खेळी प्रपंच भानू ॥ ६ ॥

अंबा अंबिका प्रसन्न होउनी । वैष्णावासी दर्शन देउनी । सांवळें रूप प्रगटोनी । वैष्णवां माजी गर्जोनी । सिंहनादें एका जनार्दनीं भरुनी । अंबा निवांत राहिली ये ॥ ७ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel