अनादि सिद्ध पंढरपूर । नांदे विठाई सुंदर । कर ठेवुनी कटावर । उभी रहासी निरंतर वो ॥ १ ॥
गोंधळा येवो जगदंबे । विठाबाई तूं मूळस्तंभे ॥ध्रु०॥
शुक सनकादिक गोंधळी । दिवटा भावें पोत पाजळी । मध्यें पुंडलिक दिवटा बळी ॥ २ ॥
ऐसा गोंधळ घाला निका । डाक वाजली तिहीं लोका । शरण जनार्दनीं एका । गोंधळ गातां उदो उदो देखा ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.