रात्रीमाजीं स्वप्न देखिलें । परपुरुषाचें घर पळालें । तेथें नागवें आडवें आलें । तेणें उघड्यासी गिळिलें ॥ १ ॥

नवल माझें तुम्हीं पहा । उगवें नुगवतां उगेच रहा ॥ध्रु०॥

माझ्या नवलाची परी । खालीं कुंभार वरते चाक फेरी । लक्ष लागें तोचि येईना हरी । ऐशी नवलाची कोण परी ॥ २ ॥

नवल पाहून बहु भ्यालें । या जगामधीं नाहीं आले । ते स्वदेहासी मुकले । ऐशापरी नरनारी ठकले ॥ ३ ॥

या नवलासी गिळून । एक राहिला जनार्दन । एका जनार्दनीं शरण । तो नवली नाहीं भिन्न ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel