नका धरूं धरूं अनुमान । आले मुसळासी कान । जातियाची पाळी करी रुदन । वेधियलें मन चाटुवाचे ॥ १ ॥

अर्थ करा माझे भाई । नका हिंडूं दिशा दाही ॥ध्रु०॥

उठिला रागावूनि पाटा । येउनी बैसला दारवंटा । मोडिला काथवटीचा थाटा । वरवंटा नाचतसे ॥ २ ॥

चूल धांवूनी आली बाहेरी । रागावली घारीवरी । शिंकेकरी मारामारी । घरकुलासी भेडसावी ॥ ३ ॥

घर जाहलें जुनाट वाउगें । पाया निघाला लागवेगेम । भिंत उडाली सवेगें । कोणी कोणा आवरीना ॥ ४ ॥

एका जनार्दनीं म्हणे । न कळे वेदांतीया बोलणें । मतवादीयांचें ठाणें । सहज गेलें उठोनी ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel